This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

प्रथम राष्ट्रीय लिंगायत महासभा अधिवेशन आयोजित

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

जागतिक लिंगायत महासभा ही लिंगायतांची प्राथमिक संस्था आहे . बाराव्या शतकात जगद्गुरू बसवण्णा यांनी स्थापन केलेला लिंगायत धर्म हा मानवी मूल्ये आणि समानतेचा धर्म आहे . त्यामुळे ४ आणि ५ मार्चला , बिदर जिल्ह्यातील , बसवकल्याण  प्रथम राष्ट्रीय लिंगायत महासभा अधिवेशन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली .

शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी यांनी जागतिक लिंगायत महासभेच्या राष्ट्रीय संघटनेच्या नेतृत्वाखाली , प्रथम राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन ४ आणि ५ मार्च २०२३ रोजी , बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण येथे आयोजित केले जाणार असल्याची माहीती दिली .

या महाअधिवेशनात कर्नाटक , महाराष्ट्र , आंध्र प्रदेश , तेलंगणा , तामिळनाडू , तसेच हजारोंच्या संख्येने , बसवकल्याण महा अधिवेशनामध्ये , सहभागी होणारं आहेत.तसेच लिंगायतपर , बसवपर संघटना , राष्ट्रीय बसवदल , लिंगायत धर्म महासभा , बसवदल , बसव समिती बेंगळूर , साहित्य परिषद , लिंगायत मठाधीश संघ , बसवेश्वर पंचकमिटी , बसवकल्याण तसेच अन्य अनेक संघटनांच्या सहकार्याने हे महा अधिवेशन भरवण्यात आले आहे ..

लिंगायत धर्माची तत्वे , सिद्धांत , आणि मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने लिंगायत महासभा स्थापन करण्यात आली आहे . १२ व्या शतकात स्थापन केलेल्या स्वतंत्र लिंगायत धर्माला , अल्पसंख्यांक आणि संविधानात्मक मान्यता मिळावी हा जागतिक लिंगायत महासभेचा मुख्य उद्देश आहे .यासाठीच बिदर मध्ये हे अधिवेशन आयोजित करण्याचे मुख्य कारण आहे असे त्यांनी सांगितले .


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now