This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*शेतकरी आर्थिक दृष्ट्या भक्कम झाला पाहिजे : किरण  जाधव*

*शेतकरी आर्थिक दृष्ट्या भक्कम झाला पाहिजे : किरण  जाधव*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मजगाव येथे रिकामी गाडी पळविण्याच्या जंगी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा दिनांक 4 मार्च आणि 5 मार्च रोजी करण्यात आले आहे.

सदर स्पर्धा हे राज्य ओबीसी युवा मोर्चा सचिव आणि सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांच्या सहकार्याने पार पडत आहे. तसेच ही स्पर्धा मजगाव महामार्गावर पार पडत असून आज या शर्यतीचे उद्घाटन थाटात करण्यात आले.

प्रारंभी गणेश प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी किरण जाधव यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना किरण जाधव यांनी अन्नदाता शेतकरी आर्थिक दृष्ट्या भक्कम झाला तर देशाचा कणा सक्षम होणार असल्याचे प्रतिपादन केले. त्यानंतर ते म्हणाले की शेतकऱ्यांसाठी जोड व्यवसाय सेंद्रिय शेती आदींच्या अनुषंगाने कार्यशाळांचे आयोजन काळाची गरज आहे. त्याबरोबर महिलांच्या आणि विद्यार्थ्यांमध्ये कलागुण जाणून घेऊ त्यांच्यासाठी ही विविध स्पर्धा आयोजित करणार असल्याचे देखील यावेळी किरण जाधव बोलताना म्हणाले.

यावेळी बैलगाडी पूजन आणि सजा पूजन करून या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेमध्ये विजेत्या झालेल्या स्पर्धकांना रोख रक्कम आणि बक्षीस देऊन उद्या गौरवण्यात येणार आहे.

या रिकामी गाडी पळविण्याच्या जंगी शर्यती मधील पहिल्या क्रमांकाला 25000 द्वितीय क्रमांकाला 21000 आणि तृतीय क्रमांक ला 18000 रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24