This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रोहिणी हट्टगडी 19 रोजी बेळगांव मध्ये*

*सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रोहिणी हट्टगडी 19 रोजी बेळगांव मध्ये*

येळ्ळूरमध्ये होणाऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आकर्षण अभिनेत्री रोहिणी हट्टगडी असणार आहेत रविवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अठराव्या येळ्ळूर मराठी ग्रामीण साहित्यामध्ये त्या उपस्थित राहणार आहेत.

या साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात त्यांची प्रकट मुलाखत होणार असून त्या येळ्ळूर येथे येत असल्याने गावकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

रोहिणी ताई यांनी छोट्या परद्यावरील चार दिवस सासूचे या मालिकेमध्ये सासूच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. त्यानंतर होणार सुन मी या घरची या मालिकेतील त्यांची भूमिका खूप गाजली त्यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली होती.

आता त्या 19 फेब्रुवारी रोजी येळ्ळूर येथे होणाऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनास येणार आहेत त्यामुळे बेळगावकरांची उत्सुकता शिगेला पोचली. तसेच त्यांची भेट घेण्याकरिता अनेक जण आतुरलेले आहेत.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply