शिंपी समाजाच्या विकासासाठी निगममंडळ स्थापन करा
श्री नामदेव शिंपी समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात त्यांनी नामदेव समाजाच्या निगम मंडळाची स्थापना करण्याची मागणी केली. यावेळी निवेदनाचा स्वीकार श्रीशैल परगी यांनी केला.
नामदेव शिंपी समाजात भावसार क्षत्रिय पाटेकर आणि निलागर या पोटजातीतील 20 लाखाहून अधिक लोक आहेत. आतापर्यंत ते दोन आरक्षणात आहेत आज पर्यंत नामदेव समाजासाठी कोणतेच महामंडळ स्थापन केले नाही.
तसेच सरकारने सुद्धा समाजाला कोणताही प्रकाराचा दिलासा दिलेला नाही. याबाबत शासनाकडे अनेक वेळा निवेदन देण्यात आली. मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.
त्यामुळे आमच्या समाजाला सामाजिक न्याय मिळावा अशी मागणी नामदेव समाजाच्या सदस्यांनी केली आणि सरकारने महामंडळ स्थापन करावे अशी मागणी केली.
त्याचबरोबर या निवेदनात त्यांनी नामदेव समाजावर अन्याय होत आहे जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण लढणार असल्याचे सांगितले तसेच समाजातील मुलांना शैक्षणिक सुविधा मिळवून द्याव्यात. अशी मागणी देखील यावेळी निवेदनाद्वारे श्री नामदेव समाजाच्या सदस्यांनी केली.