*बेळगाव येथील वाहनफेरीसाठी दुमदुमला हिंदुत्वाचा जयघोष_ *
*हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त आयोजित वाहनफेरीला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !*
* बेळगाव – हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडणे अन् धर्मशिक्षणाद्वारे हिंदूंना संघटित करणे, तसेच ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची पायाभरणी करणे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवार, 19 मार्च 2023 या दिवशी मालिनी परिसर, वडगाव मेन रोड, शहापूर पोलीस ठाण्याजवळ, भारत नगर, शहापूर येथे सायंकाळी 5.30 वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या प्रसारासाठी 16 मार्चला शहरात वाहनफेरी काढण्यात आली.
या फेरीची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून झाली. प्रारंभी ध्वजाचे पूजन उद्योजक श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते पुरोहित श्री श्रीपाद देशपांडे यांनी केले. या फेरीमध्ये लोकसेवा फाउंडेशनचे श्री वीरेश हिरेमठ, एंजल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ मीना बेनके आणि हिंदू जनजागृती समिती बेळगाव समन्वयक श्री ऋषिकेश गुर्जर उपस्थित होते.
या वाहनफेरीला हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. फेरीत असणारे भगवे ध्वज, धर्माभिमानी हिंदूंनी परिधान केले भगवे फेटे, फेरीत देण्यात आलेल्या हिंदुत्व जागृत करणार्या घोषणा यांमुळे अवघे बेळगावी शहर भगवेमय झाले होते. या वेळी जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्, भारत मातेचा विजय असो, हिंदु एकजुटीचा विजय असो, हिंदूंनो जागे व्हा, वंदे मातरम् यांसह अन्य घोषणा देण्यात आल्या. भगवे ध्वज आणि उत्स्फूर्त जयघोष यांमुळे संपूर्ण वातावरणात शौर्य आणि चैतन्य स्फुरल्याचे दिसून आले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, महाद्वार रोड, एस्.पी.एम्. रोड, कचेरी रोड, कोरे गल्ली, दाणे गल्ली, खडे बाजार रोड शहापूर, बॅरिस्टर नाथ पै सर्कल, आयुर्वेदिक कॉलेज रोड, आनंदवाडी, वडगाव मेन रोड, दत्त गल्ली वडगाव, सोनार गल्ली, धामणे रोड, चावडी गल्ली, विष्णू गल्ली मेन रोड, विष्णू गल्ली, पाटील गल्ली, कारभार गल्ली, नाझर कॅम्प मेन रोड, मालिनी परिसर, भारत नगर शहापूर येथे फेरीची समाप्ती करण्यात आली. या वेळी ऋषिकेश गुर्जर आणि सौ मीना बेनके यांनी आपले यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले . श्री. ऋषिकेश गुर्जर यांनी 19 मार्चला होणार्या सभेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन केले. या फेरीसाठी बेळगाव व आजूबाजूच्या या गावांमधील धर्मप्रेमी फेरीसाठी उपस्थित होते. अत्यंत शिस्तबद्ध आणि हिंदुत्वाचे स्फुल्लींग चेतवणार्या फेरीने बेळगाववासियांचे मन जिंकले.