This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*अनर्थ घडेल का ठळेल……??????

*अनर्थ घडेल का ठळेल……??????

स्मार्ट सिटी अंतर्गत शहराचा विकास करण्यात आला आहे मात्र स्मार्ट सिटी करत असताना अजूनहीजुने असलेले बस थांबे तसेच ठेवण्यात आल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे.

 

 

 

येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक जवळील बेनन्स स्मिथ कॉलेज समोर समोरील बस थांबा मोडकळीस आला आहे. त्यामुळे एखाद्याचा जीव जाण्याची किंवा गंभीर दुखापत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

 

 

येथील बस थांब्याचे पत्रे संपूर्णतः गंजलेले आहेत. त्याशिवाय बस थांबायचे छप्पर देखील मोडकळीस आले असून एखादा प्रवासी किंवा विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडून मोठी दुखापत होण्याची शक्यता आहे.

 

 

गेल्या अनेक महिन्यांपासून ही परिस्थिती जैसे थे असून हा बस थांबा काढण्याकडे प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. जर एखादा अनर्थ टळायचा असेल तर प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन हा बस थांबा पाडावा किंवा सुस्थितीत तरी करावा अशी मागणी प्रवासी करत आहेत.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply