This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

November 2023
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*दसरा मुख्यमंत्री कप क्रीडा स्पर्धेसाठी महिला संघाला जिल्हाधिकार्यांच्या शुभेच्छा*

D Media 24

दसरा मुख्यमंत्री कप क्रीडा स्पर्धेसाठी महिला संघाला जिल्हाधिकार्यांच्या शुभेच्छा

बेळगांव ः बेळगावला हाॅकीची परंपरा असून राज्यस्तरीय म्हैसूर दसरा मुख्यमंत्री हाॅकी स्पर्धेसाठी बेळगावचा महिला हॉकी संघ रवाना होत आहे, महिला संघाने कौशल्य पणाला लावून सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत व बेळगावचा नावलौकिक वाढवावा अशा शुभेच्छा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या

जिल्हाधिकारी पुढे बोलताना म्हणाले की बेळगावची एस्ट्रोतर्फ हॉकी मैदानाची मागणी प्रशासनातर्फे लवकरच रामतीर्थ नगर येथे पूर्वत पूर्णत्वास येईल यामुळे पुन्हा एकदा बेळगाव मधून दर्जेदार हाॅकी खेळाडू निर्माण होण्यास मदत होईल असेही ते म्हणाले.

प्रारंभी प्रकाश कालकुंद्रीकर यांनी हॉकी बेळगावचे माहिती देऊन प्रास्ताविक केले दत्तात्रय जाधव यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. अध्यक्ष गुळाप्पा होसमणी यांनी प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन खात्याचे अधिकारी श्रीनिवास, डॉ. अनिल पाटील, सौ मीना अनिल बेनके उपस्थित होते.

कर्नाटक शासनाच्या युवजन व क्रीडा खात्यातर्फे दसरा मुख्यमंत्री कप क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. 16 ते 21आक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. सदर स्पर्धेसाठी हाॅकी बेळगाव मुलींच्या संघाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये श्रेया रुतकुटे, प्राजक्ता निलजकर, धनश्री शिंदे, नागेश्वरी धामणेकर, भावना किलर्गी, मृणाली भाते, विजयालक्ष्मी मुलिमनी, दर्शना रुकजे, भूमी कुगजी, श्रेया मोहिते, रेणुका मुडनगौडा, ईशा गवळी, ऐश्वर्या देसाई, श्रुती येळ्ळूरकर, मुस्कान कित्तूर, सुधाकर चाळके, संघ व्यवस्थापक आदी शनिवार दि. 14 आक्टोबर रोजी सायंकाळी म्हैसूरला रवाना होणार आहे.

समारंभाला उपाध्यक्ष पूजा जाधव, विनोद पाटील, मनोहर पाटील, आशा होसमणी, विकास कलघटगी, अश्विनी बस्तवाडकर, नामदेव सावंत, श्रीकांत आजगावकर, गणपत गावडे, संजय शिंदे, उत्तम शिंदे, निखिल शिंदे, विजय उपाध्ये, वेंकटेश महारेड्डी आदी उपस्थित होते.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply