अभिनेते शिवराज कुमार यांनी आज बेळगावला दिली भेट
वेद या चित्रपटाचे प्रमोशन करण्याकरीता अभिनेते शिवराज कुमार यांनी आज बेळगाव ला भेट दिली. प्रारंभी त्यांनी चन्नमा सर्कल येथे कित्तूर राणी चन्नम्माच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .
त्यानंतर चित्रा चित्रपटगृहात आलेल्या चित्रपटाच्या टीमचे चाहत्यांनी जल्लोषात स्वागत केले.यावेळी अभिनेते शिवराज कुमार, गीता शिवराज कुमार, दिग्दर्शक हर्षा मास्टर आणि वेद चित्रपटाची नायिका देखील उपस्थित होती. यावेळी त्यांनी चित्रपटातील गाण्यांवर नृत्य करून रसिकांचे मनोरंजन केले.
शिवण्णा येताच त्यांनी फटाके फोडले आणि त्यांच्यावर फुलांची उधळण केली. शिवराजकुमार येताच पुनीत राजकुमार यांचा जयजयकार केला. हजारो चाहत्यांनी गर्दी करून शिवण्णासोबत जल्लोष केला.यावेळी चित्रपटात एक चांगला संदेश असून हा चित्रपट पाहावा, अशी विनंती अभिनेते व अभिनेत्री यांनी यावेळी केली.शिवण्णा सोबत सेल्फी घेण्याकरिता चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती .यावेळी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची दमछाक झाली.