This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

December 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*कसाई गल्ली येथे कॅनरा बँकेच्या एटीएम ला लागली आग – आगीत लाख रुपये भस्मसात*

*कसाई गल्ली येथे कॅनरा बँकेच्या एटीएम ला लागली आग – आगीत लाख रुपये भस्मसात*
D Media 24

कसाई गल्ली येथे कॅनरा बँकेच्या एटीएम ला लागली आग – आगीत लाख रुपये भस्मसात

कसाई गल्ली हुक्केरी येथे आज सकाळी एटीएम शॉर्टसर्किटने भीषण आग लागल्याची घटना घडली असून या घटनेमध्ये कॅनरा बँक चे एटीएम जळून भस्मसात झाले आहे.ही घटना आज सकाळी घडली आहे.

या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून कोणताही अनर्थ घडला नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

हुकेरी येथील कसाई गल्लीमध्ये कॅनरा बँकेच्या एटीएम आहे या एटीएम मध्ये शॉर्टसर्किटमुळे आज सकाळी आग लागली ज्यावेळी आग लागली तेव्हा आजूबाजूच्या परिसरात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

पहाटेपासूनच येथे पावसाला सुरुवात झाली या पावसामध्येच एटीएम ला आग लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले त्यामुळे धुराचे लोळ आकाशात पसरत होते.

सदर माहिती समजतात नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आले यावेळी या दुर्घटनेमध्ये एटीएम मधील लाखो रुपये जळाले असून नेमका आकडा समजू शकला नाही.
या घटनेत आजूबाजूच्या दुकानांना आग लागून दुकानदारांचेही नुकसान झाले आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply