सीमाकवी रवी पाटील यांचा गडहिंग्लज येथे बालकुमार साहित्य संमेलनात सहभाग
बेळगाव: सीमाभागातील साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपली खास ओळख निर्माण करणारे सीमाकवी रवी पाटील (कुद्रेमानी, बेळगाव) हे सोमवार, ३० डिसेंबर २०२४ रोजी होणाऱ्या गडहिंग्लज येथील दुसऱ्या बालकुमार साहित्य संमेलनात सहभागी होणार आहेत. या संमेलनाचे आयोजन सौ. विजयमाला दिनकरराव शिंदे हायस्कूलच्या वतीने करण्यात आले असून, रवी पाटील आपल्या कवितांमधून सीमाभागातील व्यथा, वेदना आणि साहित्यिक आशय सादर करणार आहेत.
राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बु. येथे गेल्या २३ वर्षांपासून मराठी अध्यापक म्हणून कार्यरत रवी पाटील हे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतात. ते चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे उपक्रमशील अध्यक्ष असून, पत्रकार, निवेदक आणि समालोचक म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत.
गडहिंग्लजवासीयांसाठी ही साहित्यिक पर्वणी ठरणार असून, साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमाला हजेरी लावून रवी पाटील यांच्या कवितांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.यामुळे चंदगड तालुका आणि सीमाभागात रवी पाटील यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.