बेळगाव:तालुक्यातील कंग्राळी बि.के गावामध्ये सालाबाद प्रमाणे महालक्ष्मीदेवी वाढदिवस व ओटी भरण्याचा कार्यक्रमाची भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली.सकाळी विधिवतपणे पूजाअर्चा करून गावांमध्ये ढोल ताशा सह वाजत गाजत कलश व भंडारा मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये विधिवत पूजन करून ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य यल्लोजीराव पाटील यांनी सांगितले की १९८३ पासून सालाबाद प्रमाणे दरवर्षी आम्ही गावांमध्ये महालक्ष्मी देवीचे ओटी भरण्याचा कार्यक्रम करत असतो. त्याचप्रमाणे यावर्षीही यात्रा भरवली आहे. यामध्ये गावातील दिवस देवसकी पंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील युवक मंडळांचा मोठा सहभाग असतो.
याप्रसंगी देवसकी पंच मारुती पाटील, याल्लाप्पा पाटील, महादेव पाटील, याल्लाप्पा हर्जे, मारुती पाटील, शंकर पाटील, बाळू पाटील,राजू चव्हाण,मल्लाप्पा शांताराम पाटील, पुजारी मल्लाप्पा रामू सुतार, शंकर सुतार, संतोष चौगुले ग्राम पंचायत सदस्य जयराम पाटील,यल्लोजी पाटील,अनिल पावशे,नवनाथ पुजारी, प्रशांत पवार,शंकर कोनेरी, मल्लाप्पा पाटील उपस्थित होते.