2 हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय
भारतीय रिझर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्या नागरिकांकडे दोन हजारांच्या नोटा आहेत त्या बँकेत बदलून मिळतील असे देखील कळविले आहे.
मात्र या नोटा बदलून घेत असताना फक्त वीस हजार रुपयांची मर्यादा नागरिकांना असणार आहे. भारतीय रिझर्व बँकेने शुक्रवारी एका पत्रकात दोन हजार रुपयांच्या नोटा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरिक दोन हजार रुपयांच्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा करू शकतात किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत इतर रकमेच्या नोटांमध्ये त्याचा बदल करू शकतात असे देखील आरबीआयने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.