This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2023
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*54 वा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा पडला पार*


54 वा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा पडला पार

जीवनविद्या मिशनच्या वतीने 54 वा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा बेळगाव येथील संभाजी उद्यान येथे पार पाडला आहे. सद्गुरु श्री वामनराव पै यांचे सुपुत्र श्री प्रल्हाद वामनराव पै यांचे या ठिकाणी प्रबोधन झाले. ते यावेळी प्रबोधन करताना म्हणाले की ज्ञानेश्वर माउली सोहळा आणि विषय प्रत्येक कृती राष्ट्र हिताची विश्र्वशांती हे कसे. याचे उत्तर असे कि ज्ञानेश्वर माऊली काय भगवान श्री कृष्ण काय सर्वांना एकच सांगायचं असते.

वास्तविक भगवत गीता समजायला कठीण म्हणून ७०० श्लोक सर्वांना समजावेत म्हणून ज्ञानेश्वर माउलींनी ९००० ओव्या लिहल्या म्हणजे भगवत गीता समजणे किती कठीण आहे हे कळेल. तरीही श्लोक आणि ओव्या मधून संताना नेमके जे सांगायचं ते कळत नाही म्हणून जीवनविद्येची निर्मिती झाली. जीवनविद्येत वेद उपनिषद आणि संतांचे वचन ह्या सर्व गोष्टींचा समावेश आहे.संतांचा वचनात शब्दार्थ भावार्थ गुह्यर्थ आणि परमार्थ असे चार अर्थ असतात. म्हणूनच माउलींनी ९००० ओव्या लिहूनी हे सद्गुरुंकडून समजून घे असे म्हंटले.

सर्वसाधारणतः लोकांनी या ओव्यांचे संत वचनांचे भावार्थ पर्यंत मांडले.त्याच्यापुढे त्यांना माहीतच नसते. सद्गुरूंनी जीवनविद्या निर्माण केले त्याचा कारण सर्व सुखी व्हावे असेच आहे. म्हणून गीतेतले पहिला सहा अध्याय कर्म योगावर दुसरे सहा अध्याय ज्ञान योगावर,तर तिसरे सहा अध्याय हे भक्ती योगावर आधारित आहे. जीवनविद्या म्हणजे जीवनाचा शास्त्र आणि जीवन जगण्याची कला आहे.ज्ञानेश्वरी, भगवत गीता सुद्धा जीवन जगण्याची कलाच शिकवतात. तू मन हे मीची करी याचा खरा अर्थ खूप खोल आहे किंबहुना संपूर्ण दिव्य साधना त्यात आहे..”मी” म्हणजे जो सर्वात आहे आणि तोच सर्वातून मी म्हणतो तो मी आहे. संकल्प म्हणजे काय हेही कळत नसते, संकल्प म्हणजे मी देह ही कल्पना. मी देह नसून सतचितआनंद स्वरूप आहे हे सद्गुरू शिवाय कळणे नाही. कर्मावर आपले अधिकार असते असे सद्गुरू सांगतात.

फळ मिळेलच अपेक्षा असो किंवा नसो. सत्कर्म आणि दुष्कर्म हे कर्माचे प्रकार,यात इच्छा विचार उच्चार आणि आचार असे प्रकारे असतात. सर्वांचा हिताचा कर्म हे सत्कर्म, निसर्गनियमांशी सुसंगत कर्म असले पाहिजे. म्हणून प्रत्येक कृती म्हणजे प्रत्येक कर्म ही सर्वांचं हिताचे सर्वांचं भल्याचे असले पाहिजे. म्हणून सार हेच ‘प्रत्येक कृती राष्ट्रहिताची विश्र्वशंतीची.’ हेच सद्गुरूंनाही अभिप्रेत तेच माऊलीनाही तेच अभिप्रेत.

 

कर्मयोग म्हणजे कर्माचे बंध आणि कर्म फळाचा आस्वाद दोन्ही टाकून सोडून कर्म करणे. सर्व साधारणतः आपण मी माझा आणि मलाच यात अडकलेले असतो. यालाच कर्म बंध असे म्हणतात. कर्म केले की फळ हे मिळणारच. आपण करत असलेले कर्म सर्वांचं हिताचा आहे का हे पाहणे आवश्यक.आपले मन मोठं करायला पाहिजे. मी केले मलाच मिळाले पाहिजे सर्व माझ्याच आहे हे योग्य नाही. वास्तविक सर्वांमुळे मी आहे आणि सर्वांमध्ये मी आहे. म्हणून मी कोणालाही दुःख दिले त्रास दिले ते दुःख माझ्याकडेच परत येणार सहस्त्र पटीने हे लक्षात ठेवले पाहिजे, कारण तू आणि मी वेगळा नाहीच ही वस्तुस्थिती आहे. एकच मी अनेक झाला अनंत रूपे अनंत वेशे चर अचर रूपाने प्रगट झाला. सर्वात तो एकच आहे आणि तोच मी म्हणतो. सर्वांमुळे मी आहे ही कृतज्ञता आणि सर्वामध्ये मीच आहे हा अध्यात्म spirutuality. राष्ट्र हित म्हणजे सर्वांचं हित, राष्ट्र आणि आपण वेगळे नाही. आपण जितकं व्यापक होऊ तितकं मोठे होऊ. म्हणून जे काही करतो ते राष्ट्राचा विचार करून करायला पाहिजे.आणि त्यातच विश्र्वशांती सुद्धा दडले आहे. आपण राष्ट्रीय जीवनाचे पंचशील आचरणात आणायला पाहिजे.

राष्ट्र शिस्त – आपण खरे सांगायचं म्हणजे अत्यंत बेशिस्त आहोत. नियम आपल्या दृष्टीने मोडण्यासाठीच असे वाटते. आपण राष्ट्र म्हणून विचार न केल्यामुळे अनेक परचक्र आपल्यावर चालून आले.

राष्ट्र प्रेम – आपल्याला आपल्या जाती व इतर गोष्टींवर जितकं प्रेम तितकं राष्ट्रावर नाही हे दुर्दैव आहे

राष्ट्र संरक्षण – आपण राष्ट्राचे संरक्षण करायला सीमेवर जाऊ शकत नसलो तरी जवानांचा आणि राष्ट्रांचे संपत्तीचे आदर केला पाहिजे.

Happiness Index मधे भारत खूप मागे आहे कारण आपण सुख देत नाही लोकांना दुःख अधिक देतो त्यांचा दुःखात सुख शोधतो. आपण खरे तर फक्त संस्कार या एका गोष्टींमुळेच वेगळे आहोत. ते सोडले तर आपण सर्व एकच आहोत. म्हणून ही *विश्र्वप्रार्थना* सर्व भाषांमध्ये पोहचवत आहोत जेणेकरून सर्वात एक तो सर्वेश्वर परमेश्वर कळेल आणि राष्ट्र आणि विश्व सुखी होईल.हाच आमच्या ध्येय आणि हेच सद्गुरुंचे संकल्प. विश्र्वप्रार्थना सर्वांचं पेशी पेशीत गेले पाहिजे रक्तात भिनली पाहिजे.

यावेळी कार्यक्रमाचि सुरवात ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाणे झाली. त्याचबरोबर संगीत जीवनविद्या सादर करण्यात आली.
या कार्यक्रमाला बेळगाव खानापूर गोवा पुणे सातारा सांगली मिरज, कोल्हापूर, कोकण तसेच मुंबई वरून नामाधारक उपस्थित होते.यावेळी बेळगाव च्या उपमहापौर सौ. रेश्मा पाटीलआणी श्री किरण जाधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे निवेदन श्री संतोष तोत्रे, प्रशांत बिर्जे,रेखा हिरोजी, व रवींद्र सुलेभावी यांनी केले
यावेळी बेळगाव शाखेचे पालक ट्रस्टी श्री विलास परब, जीवनविद्या मिशनाचे सचिव श्री काळे यांचे मार्गदर्शनखली बेळगाव शाखेचे पदाधिकारी,सर्व नामाधारक, युवा युवती याचे कार्यक्रम यशस्वि करण्यास मोठा हातभार् लागला.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply