This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*भरधाव दुचाकी व टेम्पो अपघातात 3 युवक जागीच ठार*

*भरधाव दुचाकी व टेम्पो अपघातात 3 युवक जागीच ठार*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरधाव दुचाकी व टेम्पो अपघातात 3 युवक जागीच ठार

चिक्कोडी तालुक्यातील बसवणाळगड्डे येथे भरधाव दुचाकी व टेम्पो मध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकी वरील एकाच गावातील तिघे युवक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री घडली आहे.

या घटनेत सतीश हिरेकोडी वय 32 यल्लाप्पा चंद्रकांत पाटील वय 33 प्रशांत भैरू खोत वय 33 सर्वजण राहणार केरूर अशी अपघातात मृत्यू झालेल्या लोकांची नावे आहेत हे तिघेही युवक एका दुचाकी वरून चिक्कोडीहुन केरूर गावाकडे निघाले होते.

त्यावेळी चिकोडी अंकली रस्त्यावर हा भीषण अपघात घडला यावेळी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमीला इस्पितळात घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळी देऊन पंचनामा केला. मृत झालेल्या तिघेही युवक एकाच गावचे रहिवासी असल्याने केरुर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24