This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*रेल्वे अपघातात २३३ जणांचा मृत्यू, ९०० हून अधिक जखमी*

*रेल्वे अपघातात २३३ जणांचा मृत्यू, ९०० हून अधिक जखमी*

<span;> ओडिशामध्ये तीन रेल्वेंच्या अपघातात आतापर्यंतच्या माहितीनुसार २३३ जणांचा मृत्यू झाला असून ९०० हून अधिकजण जखमी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं असून ‘एनडीआरएफ’च्या ३ तुकड्या कार्यरत आहेत. ओडिशा राज्य आपत्ती निवारण दलाच्या चार तुकड्या घटनास्थळी आहेत.
<span;>

<span;>ओडिशातील बालासोर जिल्ह्यात तीन रेल्वे दुर्घटनाग्रस्त
<span;>ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहानगाजवळ अपघात
<span;>शुक्रवारी सायंकाळी सात वाजता अपघात घडला.

<span;>वृत्तसंस्था, बालासोर (ओडिशा) :ओडिशातील बहानगा गावाजवळ (जि. बालासोर) घसरलेल्या रेल्वेच्या डब्यांची अन्य दोन रेल्वेगाड्यांना धडक बसून झालेल्या अपघातात आतापर्यंत २३३ जण ठार झाले आहेत आणि ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी ही माहिती दिली आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी सात वाजता घडला. अपघातानंतर तातडीने मदत आणि बचावकार्य राबविण्यात आले. ओडिशा, पश्चिम बंगालमधून आपत्ती निवारण दलाची पथके रवाना करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आदींनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. ओडिशामध्ये आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

<span;>पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तातडीने मदत पथके ओडिशाकडे रवाना केली. बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (१२८६४) बहानगा बाजार येथे रुळांवरून घसरल्याने तिचे डबे रुळांवर पडले होते. हे डबे शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसला (१२८४१) धडकले. त्यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे एका मालगाडीला धडकले. अपघाताचे ठिकाण हावड्यापासून २५५ किलोमीटरवर आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

<span;>रेल्वेच्या घसरलेल्या डब्यांमध्ये अनेक प्रवासी अडकले होते. स्थानिक रहिवाशांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. अंधारामुळे मदत कार्यात अडथळे आले. अपघातातील १३२ जखमींना सोरो, गोपालपूर, खांटपाडा येथील सरकारी हॉस्पिटलांत हलविल्याची माहिती ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिली. महसूलमंत्री प्रमिला मलिक आणि विशेष सहाय सचिव सत्यव्रत साहू यांना घटनास्थळी जाण्याचा आदेश मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दिला.

<span;>रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून अपघाताबाबत सविस्तर माहिती घेतली. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य राबविण्यात येत आहे. आपद्ग्रस्तांना सर्वतोपरी साह्य देण्यात येईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

<span;>रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईंकांना १० लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. तर, अपघातामधील गंभीर जखमींना २ लाख रुपये तर किरकोळ जखमी असणाऱ्या प्रवाशांना ५० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply