॥ सीमाप्रश्न सुटून सीमा बांधव महाराष्ट्रात जाणे हीच कै. बी आय पाटील यांना खरी श्रद्धांजली ॥
कंग्राळी खुर्द – सीमा प्रश्नाची सोडवणूक होऊन सर्व सीमा बांधव महाराष्ट्रात गेले पाहिजे आणि हिच खरी श्रद्धांजली कै. आम . बी आय पाटील यांना असेल अशा प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या तृतीय स्मृतीदिना वेळी मनोगतातून व्यक्त केल्या .
गावच्या मध्यवर्ती भागात ग्राम पंचायती समोरील चौकात झालेल्या तृतिय स्मृतिदिन कार्यक्रमावेळी सुरवातीला श्री लक्ष्मी व , श्री मारुती मंदिरात महिला ग्राप सदस्यांच्या वतिने पुष्पहार घालून पूजन करण्यात आले त्यानंतर गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी माधव पाटील व प्रविण पाटील यांनी कै . आ. बी.आय पाटील यांच्या मोठया बॅनरला पुष्पहार अर्पण केला तर ता .म ए समिती चिटणीस एमजी पाटील, ग्राप अध्यक्षा दोडव्वा माळगी , पायी दिंडी संस्थापक निंगोजी पाटील , श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान , मराठा साम्राज्य स्पोर्टस , बालहनुमान तालीम मंडळ , प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ , बाल हनुमान दुध डेअरी , गावडे कमिटी तसेच त्यांचे कुटूंबीय व व्यक्तीगत नागरिकांनी फोटोला पुष्पहार अर्पण करून फुले वाहून आदरांजली वाहिली .
अँड एमजी पाटील , उपाध्यक्ष कल्लापा पाटील , टी.डी पाटील यांनी शब्दरूपी श्रद्धांजली वाहतांना त्याच्या सीमाप्रश्न , सामाजिक , क्रिडाक्षेत्र , धार्मिक कार्यातील कार्याचा आढावा घेऊन त्यांचा परिवार हा वारसा जोपासत असल्याचे सांगितले या स्मृतिदिना निमीताने त्यांच्या कुटूंबीय दरवर्षी विधायक उपक्रम राबवत असून या वर्षीही त्यांच्या वतीने कुस्तीपटूना प्रेरणा देणारा कुस्तीडमी तालमीला भेटी दाखल दिला तसेच गावातील राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या गौतमी पाटील , सिद्धी निलजकर , स्वराली पाटील याचा व त्यांचा पालकांचा तसेच वस्ताद काशीराम पाटील व कृष्णा पाटील यांचा कुस्तीपोशाख , शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
या स्मृतिदिना वेळी वरील मान्यवरांसह मा. अध्यक्ष यल्लापा पाटील , भाऊ पाटील , मनोहर पाटील , कल्लापा पैलवान , एम . एन. पाटील , योगेश पाटील , आर आय पाटील , मा .प्रा पौर्णिमा पाटील , मा. अध्यक्षा रूक्मीणी निलजकर , किरण पाटील नारायण पाटील , भैय्या पाटील , बाळू पूजारी , मल्लापा मुतगेकर , सर्व ग्राप सदस्य यांचेसह विविध संघटनाचे कार्यकर्ते गावातील व परिसरातील पुरुष व महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री किसन पाटील यांनी केले .
ewstz7
eki604
6ajrcz
ksm49b
y7olbs
8cqm3t
m6hefu
j8jq5y
jhcv6b
qrqzt4
eiodxy