This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*यशपाल आणि मंजुनाथ यांचा विहान फाऊंडेशन तर्फे सत्कार*

*यशपाल आणि मंजुनाथ यांचा विहान फाऊंडेशन तर्फे सत्कार*

यशपाल आणि मंजुनाथ यांचा विहान फाऊंडेशन तर्फे सत्कार

विहान फाऊंडेशन आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 चे आयोजन करण्यात आले होते तसेच कर्तृत्ववान स्केटर्सचा सन्मान. दिनांक रविवार 1 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आला.

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्स मंजुनाथ मंडोळकर आणि यशपाल पुरोहित यांची चीन येथे होणाऱ्या प्रतिष्ठित 19 व्या आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 मध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इनलाईन हॉकी या प्रकारात निवड झाली आहे. या साठी या दोघांनी मोठे परिश्रम घेतले असून त्यांचा शाल बुके व स्मुर्ती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच राष्ट्रीय पदक विजेते स्केटर्स सई पाटील, साईराज मेंडके, देवेन बामणे जयध्यान राज, अवनीश कोरीशेट्टी, शर्वरी दड्डीकर आणि राज्य पदक विजेते स्केटर्सचा सन्मान करण्यात आला.

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आणि विहान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला डॉ भीमाशंकर गुलेड आयपीएस पोलीस अधीक्षक (एसपी) याच्या शुभ हस्ते या सर्वांना सन्मानीत करण्यात आले या वेळी श्रीमती सरला हेरेकर, सोमशेखर कनगली, ज्ञाननेश्वरी कनगली, राकेश कलघाटगी, अशोक गोरे, गणेश दड्डीकर, सूर्यकांत हिंडलगेकर विठ्ठल गंगने , योगेश कुलकर्णी,सक्षम जाधव, तुकाराम पाटील व बेळगावी जिल्हा असोसिशन चे, स्केटर्स आणि पालक उपस्थित होते.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply