मुंबई:( श्रीधर पाटील)
येथील वानखेडे स्टेडियमवर भारत-न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या अंतिम तिसऱ्या कसोटीमध्ये दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजविला. शनिवारी संपूर्ण दिवसभरात एकूण पंधरा बळी टिपण्यात आले. त्यामध्ये भारताचे सहा तर न्यूझीलंडचे नऊ बळी यांचा समावेश आहे. न्युझीलँडकडून एजाज पटेल ने पाच विकेट घेऊन भारताच्या डावाला सुरुंग लावला. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावांमध्ये भारतातर्फे आर अश्विन याने तीन विकेट तर रवींद्र जडेजा याने चार विकेट आणि आकाशदीप याने एक आणि सुंदर ने एक विकेट घेऊन न्यूझीलंडला नऊ बाद 171 धावांवर रोखले.
न्यूझीलंडची अत्यंत खराब सुरुवात झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये आकाशदीपने कर्णधार टॉपला बाद केले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर ने कॉन्व्हेला 22 धावांवर बाद केले. रचीन रवींद्र लगेचच परतला. विल यंग आणि मीचल यांनी डाव सावरला. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर अश्विन याने मीचलचा झेल घेतला. हा सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर न्युझीलँड चा कोणताही फलंदाज फार काळ टिकू शकला नाही. अशा पद्धतीने न्युझीलँड ने दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा नऊ बाद 171 धावा केल्या आहेत.
भारताला पहिल्या डावामध्ये 28 धावांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे न्यूझीलंडकडे फक्त आता 143 धावांची आघाडी आहे. त्यांची एकच विकेट शिल्लक आहे. त्यामुळे रविवारी लवकरात लवकर ही विकेट घेऊन भारत विजयासाठी प्रयत्न करणार आहे.
भारताकडून शुभमन गिल यांनी सर्वाधिक 90 धावा केल्या. त्याला ऋषभ ने 60 धावा करून आणि वॉशिंग्टन सुंदर ने नाबाद 38 धावा करून चांगली साथ दिली. न्यूझीलंडच्या दुसऱ्या इनिंगमध्ये विल यंग ने सर्वाधिक 51 धावा केल्या.