मराठी भाषिक उमेदवार जाहीर झाल्यामुळे कन्नड संघटनांना उठला पोटशूळ
भाजपने महापौर आणि उप महापौर पदासाठी मराठी भाषिक उमेदवार जाहीर केल्यामुळे कन्नड संघटनांना पोटशूळ उठला असून महानगरपालिका आवारात येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या करवे संघटनेच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन महानगरपालिका आवारात प्रवेश करण्यापासून रोखले.त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.कन्नड भाषिक नगरसेवकांना महापौर,उप महापौर पदाची संधी द्यायला हवी होती असे म्हणून करवे कार्यकर्त्याने लोकप्रतिनिधींवर देखील तोंडसुख घेतले