CBSE आंतरशालेय क्रीडा आणि खेळ स्पर्धेत २०२४ मध्ये तन्वी,निधी,वेदांत यांची चमकदार कामगिरी
बेळगाव:भुवनेश्वर ओडिशा येथे १० ते १४ ऑक्टोंबर २०२४ रोजी संपन्न झालेल्या CBSE राष्ट्रीय आंतरशालेय क्रीडा आणि खेळ स्पर्धा २०२४ मध्ये तन्वी पै, निधी कुलकर्णी आणि वेदांत मिसाळे स्विमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगावच्या सदस्यांनी उत्कृष्ट कामगिरी दाखवली.
या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत ३ पदके मिळवून बेळगाव शहराचे नावलौकिक केले आहे. या जलतरण स्पर्धे तन्वी पै १सुवर्णपदक,निधी कुलकर्णी १ रौप्य, पदक,वेदांत मिसाळे १कांस्य पदक मिळविले आहे.
तन्वी पै (केएलई इंटरनॅशनल स्कूल), निधी कुलकर्णी (केएलएस पब्लिक स्कूल), वेदांत मिसाळे (ज्योती सेंट्रल स्कूल) केएलईच्या सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावा मध्ये प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर आणि डॉ. प्रभाकर कोरे (चेअरमन केएलई सोसायटी), श्री. जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाउंडेशन), Rtn. अविनाश पोतदार, श्रीमती. मानेक कपाडिया, श्रीमती. लता कित्तूर, सुधीर कुसाने, प्रसाद तेंडोलकर यांनी यशस्वी जलतरणपटूंचे कौतुक केले.