सिद्धेश्वर मंदिराची वास्तुशांती व कळसारोहण सोहळा
महाशिवरात्री निमित्त सिद्धेश्वर देवाची मिरवणूक कणबर्गी येथे काढण्यात येणार आहे.तसेच महाशिवरात्री यात्रोस्तव निमित्ताने श्री सिद्धेश्वर व्यवस्थापन मंडळ कणबर्गी यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.
श्री सिद्धेश्वर मंदिर जिर्णोद्धार कमिटीने सदर माहिती आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली त्यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.
रविवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता कणबरी गावची ग्रामदेव श्री महालक्ष्मी मंदिरापासून श्री सिद्धेश्वर मंदिराचा कळस मिरवणूक गावातील भक्त मंडळाच्या कलश मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत श्री सिद्धेश्वर मंदिर येथे गणेश मंदिर सायंकाळी सहा ते नऊ पर्यंत ची सिद्धेश्वर मंदिराच्या आवारात राक्षघ्न होम करण्यात येणार आहे .
तर मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा ते अकरा वाजेपर्यंत वास्तुशांती कळसा रोहन गुरुशरण पादपूजा अतिथी व मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.
तसेच महाशिवरात्री यात्रोत्सव निमित्ताने शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत कणबर्गे गावात सिद्धेश्वर देवाची मिरवणूक काढण्यात येणार असून दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते पाच या वेळेत श्री सिद्धेश्वर देवस्थानला सजविलेला गाडा वाजत गाजत पोचणार आहे
तर दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते सांगली पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत श्री सिद्धेश्वर व्यवस्थापन मंडळाने दिली.