कंग्राळी बी के येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा
बेळगाव: आपली संस्कृती व आपल्या धर्माची प्रत्येकाला जाणीव व्हावी व सनातन संस्कृती टिकावी यासाठी कंग्राळी बुद्रुक येथील शिवाजी पार्क, विठ्ठल मंदिर समोर श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम गुरुवार दिनांक १९/१२/२०२४ ते बुधवार दिनांक २५/१२/२०२४ पर्यंत घेण्यात आला.यामध्ये दररोज सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत भगवत गीता पठण करण्यात आली.
वैकुंठवासी चैतन्य सद्गुरु तात्यासाहेब बाबासाहेब वासकर यांच्या कृपा आशीर्वादाने व श्री गुरु हभप विठ्ठल दादा वासकर महाराज पंढरपूर यांच्या अधिपत्याखाली आणि श्रीगुरु गोपाळ तुकाराम वासकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह महाप्रसादाने संपन्न झाला. कथाकार हभप श्री कृष्णा महाराज पंढरपूरकर व सहकारी यांच्या भक्तीपूर्ण वातावरणात भागवत कथा पठण केले.गावातील नागरिकांनी भक्तिमय वातावरणात या सप्ताहमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या कार्यक्रमाप्रसंगी गावामधील सैन्य भरतीसाठी निवड झालेल्या युवती व युवकांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आला.