श्रीदेवी अनुष्ठान लोककल्याणार्थ व सकल जनहितार्थ अनुष्ठान कार्यक्रमाच्या आयोजन
बेळगांव:प्रति वर्षाप्रमाणे यंदाच्या दुसऱ्या वर्षी वेणुग्राम पुरोहित संघटना यांच्यावतीने श्रीदेवी अनुष्ठान लोककल्याणार्थ व सकल जनहितार्थ अनुष्ठान कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते.
https://www.facebook.com/DMEDIA24/videos/490318623281084/?mibextid=Nif5oz
यावेळी दिनांक 18 जानेवारी ते 20 जानेवारी पर्यंत चाललेल्या तीन दिवशी या कार्यक्रमात वेगवेगळे धार्मिक विधी करण्यात आले. सदर कार्यक्रम हा वडगाव सपार गल्ली येथील श्री बनशंकरी देवस्थान मध्ये पार पडला.
यावेळी 18 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता शोभायात्रा स्वागत गीत गोपूजन करण्यात आले . तर दिनांक 19 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता शांतीपाठ धर्म ध्वजारोहण प्रधान कर्माला सुरुवात भगिनींकडून सहस्त्रकुंकू मार्चन सेवा विष्णुसहस्त्रनाम ललिता सहस्त्रनाम जप महाप्रसाद वितरित करण्यात आला.
त्यावेळी सायंकाळी पाच ते सहा या दरम्यान कुमारीका पूजन व हळदीकुंकू समारंभ पार पडला त्यानंतर सहा ते आठ या वेळेत देवीचा गोंधळ व आरती करून मंत्र पुष्प म्हणण्यात आली.
तर आज दिनांक 20 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता शांती पाठ देवता पूजन ग्रह स्थापना ग्रह यज्ञ प्रधान होम पूर्णहुती आरती मंत्रपुष्प आशीर्वाद मान्यवरांचा सत्कार आभार प्रदर्शन व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
संध्याकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडणार आहे त्यामुळे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित व्हावे असे आवाहन वेनुग्राम पुरोहित संघटना बेळगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे.