*श्रीराम सेना कर्नाटक कडून व्हॅलेंटाईन डे ला विरोध*
गेल्या काही वर्षात 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची पाश्चात्य कुप्रथा भारतात वाढत चाललेली आहे पाश्चात त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे सादरीकरण करत हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्य घडल्याचे अनेक घटना समोर येत आहेत तसेच या दिवशी होणाऱ्या पार्ट्यातून युवक युवती यांच्यात मद्यपान ,धूम्रपान ,अमली पदार्थाचे प्रचंड सेवन इतकेच नव्हे तर या दिवशी संतती प्रतिबंधक साधनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होते.
तसेच या दिवशी मुलीवर प्रभाव पडण्यासाठी भरधाव वेगाने वाहन चालवणे असे अनेक प्रकार समाजात घडतात काही धर्मांध युवक युवतींना खोटे नवे सांगून त्यांना लव जिहाद च्या विळख्यात ओढून घेतात तसेच धर्मांतरण करणे असे अनेक प्रकार समाजात होताना पहावयास मिळतात या प्रकारांना आळा घालण्यासाठी श्रीराम सेना कर्नाटक अशा विविध अध्यात्मिक समाजसेवी संघटना सोबत घेऊन याला विरोध भारतीय प्रथांचे पालन करण्यासाठी आवाहन करण्यात आले यावेळी निपाणी तहसीलदार ऑफिस व निपाणी शहर पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले निवेदन देताना अमोल चेंडके. संतोष माने, निंगोंदा पाटील, विशाल मोहिते, बबन निर्मले, अतिश चव्हाण, अजित पारळे,. गौतमेश तोरसकर, महेश मठपती, उदय पाटील ,संतोष मोरे, दीपक बुधिहाळे, सुयोग कल्लोळे , यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले व व्हॅलेंटाईन डे वर बहिष्कार घालण्यात आला.