हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेळगाव येथे ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन !
बेळगाव- भारतीय संस्कृतीतील ‘गुरु-शिष्य परंपरा’ ही मानवजातीला हिंदु धर्माने दिलेली अद्वितीय देणगी होय ! राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना धर्मसंस्थापनेचे कार्य याच ‘गुरु-शिष्य’ परंपरेने केले आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या थोर गुरु-शिष्य परंपरेचे स्मरण करणे आवश्यक आहे. गुरुपौर्णिमेला 1 हजार पटींनी कार्यरत असलेल्या गुरुतत्त्वाचा लाभ सर्वांना व्हावा, तसेच गुरुंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या वर्षी, 3 जुलै 2023 या गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
3 जुलैला सायंकाळी 5 वाजता ‘देवज्ञ ब्राम्हण मंगल-कार्यालय‘ शहापूर, बेळगाव येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुधीर हेरेकर यांनी केले आहे.
या महोत्सवांत श्रीव्यासपूजन, श्रीगुरुपूजन, साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन, तसेच ‘संवैधानिक व धर्मधिष्ठीत हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प करा’, या विषयांवर व्याख्यान होणार आहे. या महोत्सवासाठी सतांची वंदनीय उपस्थिती राहणार आहे.
गुरुपर्णिमेच्या महोत्सवाचा निमित्ताने शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये प्रसार चालू असून विविध हिंदुत्ववादी संघटना, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. भित्तीपत्रके, हस्तपत्रके, फलकलेखन, रिक्शा, होर्डिंग, सामाजिक संकेतस्थळ यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर या महोत्सवाचा प्रसार चालू आहे.
गुरु म्हणजे निर्गुण ईश्वराचे देहधारीसगुण रूप. या गुरूंमुळेच शिष्याची जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटका होत त्याला मोक्ष प्राप्ती शक्य होते. असे गुरु आपल्या जीवनात यावे म्हणून तीव्र तळमळीने साधना करावी लागते. त्यासाठीचे मार्गदर्शन या महोत्सवात होणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्याने गुरूंचा आशीर्वाद लाभेल, तसेच हिंदूंचे धार्मिक संघटनही होईल. तरी सर्व राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चा लाभ करून घ्यावा, तसेच तुमचा मित्र -परिवार, परिचित, नातेवाईक यांनाही याचे निमंत्रण द्यावे, असे आग्रहाचे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.