बेंगळूर:
टीम इंडियाने बांगलादेश क्रिकेट टीमचा कसोटी आणि टी-ट्वेंटी मालिकेमध्ये प्रत्येकी तीन विरोधी शून्य असा क्लीन स्वीप केला. डब्ल्यूटीसी स्पर्धेसाठी आपले स्थान आणखीन मजबूत तर केलेच शिवाय मायदेशात सलग अठरा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रमही केला. बांगलादेश नंतर आता न्यूझीलंड क्रिकेट टीमचा व्हाईटवॉश होण्याचा नंबर आहे.
या दोन्ही मालिकेमध्ये टीम इंडियाचे प्रदर्शन बेहतरीन असे झाले. या दोन्ही मालिकांमधून भारताला अनेक अष्टपैलू नवोदित खेळाडू मिळालेच. यामध्ये संजू सॅमसंग, मयंक यादव, नितीश रेड्डी ,यशस्वी जयस्वाल असे नवोदित खेळाडू भारतीय संघाला मिळाले. कसोटी मध्ये रोहित शर्मा ने तर t20 मध्ये सूर्यकुमार यादवने आपले नेतृत्व यशस्वी केले.
आता न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाची तीन सामन्यांची कसोटी मालिका भारतात होणार असून यामध्ये न्यूझीलंडला क्लीन स्वीप देण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. टीम इंडियाचे लक्ष डब्ल्यूटीसी च्या अंतिम फेरीत पोचून चषक उंचावण्याचे आहे. त्यामुळे तमाम भारतीय क्रिकेट शौकिनांचे लक्ष भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेकडे लागले आहे.