बेळगावची श्री शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणूक सलग अनेक तास चालते. त्यामुळे या कालावधीत मिरवणूक पाहण्यास गर्दी करणाऱ्या शिवभक्तांसह शिवजयंती उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना शीतपेयाचे वाटप करून दिलासा देण्याद्वारे त्यांना तरतरीत ठेवण्याचे स्तुत्य कार्य युवा सेना बेळगाव गेल्या कांही वर्षापासून सातत्याने करत आहे.
त्यानुसार यावेळी देखील मिरवणुकीचे देखावे आणि विविध मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केल्या जाणाऱ्या, विशेष गर्दी होणाऱ्या शहरातील हुतात्मा चौक येथे शीतपेय वाटपाचा हा उपक्रम राबविण्यात आला. हुतात्मा चौक येथे काउंटर स्थापन करून युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शीतपेयाच्या स्वरूपात ताकाचे व पुलाव वाटप केले. या उपक्रमाचा सुमारे 3000 शिवभक्तांनी लाभ घेतला.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी युवा सेना बेळगावचे विनायक हुलजी,मल्हारी पावशे, वैभव कामत,श्वेत तवनशेट्टी,संदेश तवनशेट्टी विजय मोहिते,अद्वैत चव्हाण -पाटील,ओमकार बैलूरकर,श्रेय मिठारी,सक्षम कंग्राळकर,निलेश पाटील, अथर्व जाधव,विद्येश बडसकर,सुरज तेली, पाटील,प्रज्वल मुद्दापुरे, स्वयं कपिलेश्वरी,आदित्य गावडे,साई नायडू आदींनी विशेष परिश्रम घेतले. थंडगार ताकाचा आस्वाद घेणारे हजारो शिवभक्त सदर उपक्रमाची प्रशंसा करताना दिसत होते..🚩
Also read









