LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*वाद मिटवायला गेलेल्या पोलिसांवर तरुणांचा हल्ला*

बेळगाव :जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारासमोर आज दुपारी घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. दोन युवकांच्या गटांमध्ये सुरू असलेला वाद शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावरच काही युवकांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन गटांमध्ये शाब्दिक वाद सुरू होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मार्केट पोलीस ठाण्याचे शिपाई मल्लिकार्जुन गुंजीकर घटनास्थळी गेले असता, काही युवकांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला.

घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन्ही गटातील काही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच या घटनेत सहभागी असलेल्या इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी