Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावात तलवारीसह दहशत माजवणारा तरुण जेरबंद*

बेळगाव शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू असलेल्या तपास मोहिमेदरम्यान माळमारुती पोलिसांनी एक गंभीर गुन्हा उघडकीस आणत तलवार बाळगणाऱ्या संशयिताला अटक केली आहे.

२४ मार्च २०२६ रोजी, पोलिस उपनिरीक्षक उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संशयास्पद व्यक्तींची तपासणी सुरू असताना ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीनेंद्र पद्मप्पा चौगले (रा. शास्त्री गल्ली, बसवन कुडची, बेळगाव) हा तरुण सार्वजनिक ठिकाणी हातात धारदार तलवार घेऊन फिरताना आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करताना आढळला.

तत्काळ कारवाई करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून तलवार जप्त केली. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५/२०२६ अंतर्गत भारतीय शस्त्र कायदा कलम २७(१) आणि केपी अ‍ॅक्ट कलम ९७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सध्या आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू असून, शहरात अशा प्रकारच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*