Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावच्या ३ वर्षीय नवतेजचा जागतिक विक्रम*

बेळगाव : अवघ्या तीन वर्षांच्या कुमार नवतेज भूषण पालकर याने आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेच्या जोरावर जागतिक विक्रमाची नोंद करत बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सावगाव रोड परिसरात राहणाऱ्या नवतेजने “चित्रांशिवाय केवळ टेक्स्टमधून १५ फळे आणि प्राण्यांची नावे सर्वात जलद वाचणे” या प्रकारात अवघ्या ३० सेकंदांत कामगिरी पूर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले.

या अनोख्या कामगिरीची दखल घेत नवतेजची नोंद प्रतिष्ठित Worldwide Book of Records मध्ये करण्यात आली आहे. इतक्या कमी वयात मिळालेल्या या यशामुळे पालकर कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नवतेजच्या या यशामागे त्याचे वडील भूषण पालकर आणि आई प्रज्ञा पालकर यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रेमळ संगोपन आणि मेहनत महत्त्वाची ठरली आहे. लहान वयापासूनच मुलाच्या बौद्धिक विकासाकडे विशेष लक्ष देत त्यांनी त्याला प्रोत्साहन दिले.
नवतेजच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे बेळगावसह संपूर्ण परिसरातून त्याचे कौतुक होत असून भविष्यात तो आणखी मोठी यशे संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
बेळगाव काँग्रेसमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! शहराध्यक्ष निवडीच्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी*कारगिल विजय दिन: बेळगावातील MARATHA LIRC मध्ये शहीदांना मानवंदना**सेल्फी घेताना घडली शोकांतिका; तीन दिवसांनी युवकाचा मृतदेह सापडला**मराठा मंडळ पॉलिटेक्निकमध्ये 'नशा मुक्त भारत अभियान' अंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात**हिरेबागेवाडीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ₹1.22 लाख जप्त**कारगिल विजय दिन: बेळगावात आमदार आसिफ सेठ यांनी शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली**कारगिल विजय दिन: बेळगावात माजी सैनिकांची भव्य तिरंगा बाईक रॅली*कडोलीतील श्री मातंगी देवी मंदिराच्या विकासासाठी ₹10 लाखांचा निधी; स्लॅब पूजन संपन्नसरकारी माध्यमिक शाळा कल्लेहोळ येथे पालक मेळावा व माजी विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्नकंग्राळी बी.के.चा विद्यार्थी शाळेतून बेपत्ता; नागरिकांना शोधासाठी आवाहन