LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेळगावकडे येताना काळाचा घाला; दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू*

बेळगाव : लोकापूर–येरगट्टी मार्गावर झालेल्या भीषण रस्ता अपघातात एका 23 वर्षीय तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कटकळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जून 2026 रोजी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास एम. चंदरगी गावाच्या हद्दीत संजू हळ्ळी यांच्या शेताजवळ हा अपघात झाला.

यादगिरी जिल्ह्यातील बम्मनगुड्ड तांडा येथील रहिवासी जगदीश रवी पवार (वय 23) हे आपल्या बजाज पल्सर एनएस 125 दुचाकीवरून बागलकोटकडून बेळगावच्या दिशेने जात होते. यावेळी रस्त्यावर कोणतेही संकेत फलक किंवा इशारा न देता उभ्या करण्यात आलेल्या टाटा गुड्स ट्रकला दुचाकीची मागील बाजूस जोरदार धडक बसली.

या अपघातात जगदीश यांच्या डोक्याला व डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

अपघातास कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून ट्रक चालकाविरोधात कटकळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 285 आणि 106(1) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*