Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेची माहेश्वरी अंधशाळेला भेट*

 दिनांक 8 ऑगस्ट रोजी मराठी विद्यानिकेतन शाळेच्या इयत्ता आठवीच्या मुलांनी माहेश्वरी अंधशाळेला भेट दिली.तेथील विद्यार्थ्यांची शिकण्याची पद्धत, त्यांची शिस्त, स्वावलंबन आत्मविश्वास आणि जिद्द  विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता आली.दृष्टी नसली तरी स्वप्नांना आणि कर्तृत्वाला मर्यादा नसतात, याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. अनेक प्रश्न विचारून विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतलं. 

    प्रत्येक काम ते विशेष विद्यार्थी अत्यंत आत्मविश्वासाने आणि कौशल्याने करत होते. त्यांची शिकण्याची तळमळ पाहून  विद्यार्थ्यांची कारणे आणि तक्रारी नक्कीच शुल्लक वाटू लागतात. या विशेष विद्यार्थ्यांनी संगणक हाताळून तबला, पेटीच्या सहाय्याने त्यांनी गीत गाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले .ते विद्यार्थी क्रिकेट ,बुद्धिबळ खेळतात. हे सर्व खेळ कसे खेळतात ?याची माहिती  विद्यार्थ्यांनी समजावून घेतली. त्यांची लिहिण्याची ,वाचनाची पद्धत समजावून घेतली आणि स्वतःला पडलेल्या अनेक प्रश्नांचे निरसन ही करून घेतले.

      येणाऱ्या 15 ऑगस्टसाठी या विद्यार्थ्यांची  पथसंचलनाच्या तयारीचे प्रात्यक्षिक  पाहायला मिळाले . माहेश्वरी अंधशाळेच्या मुख्याध्यापिका अनिता गावडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

       या विशेष अभ्यास दौऱ्यासाठी शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक एन .सी .उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील ,शिक्षण संयोजिका नीला आपटे, सविता पवार यांचे प्रोत्साहन लाभले. शिक्षक वर्ग माया पाटील , सरिता बांदेकर आणि महेश हगीदळे, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*‘तिरंगा ऑन व्हील्स’! तरुण सायकलस्वारांची येळ्ळुर किल्ल्याकडे देशभक्तीची सवारी**बेळगावच्या ‘प्रयत्न’ संस्थेकडून खानापूरच्या शासकीय पीयू महाविद्यालयाला ३९ डेस्कची देणगी**मच्छे गावात तरुणावर जीवघेणा हल्ला; गंभीर जखमी, पोलिसांकडून तपास सुरू**मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेची माहेश्वरी अंधशाळेला भेट**मालकाच्या मृत्यूनंतरही स्वतःला मालक सांगत जमीन विक्रीचा प्रयत्न; 75 वर्षीय आरोपी अटकेत**इणाम बडस येथे 61 लाखांच्या शाळा व अंगणवाडी इमारतींचे लोकार्पण; ग्रामस्थांची जुनी मागणी पूर्ण*बेळगावातील शिवं असोसिएट्सवर ED ची मोठी कारवाई; ₹2,110 कोटींच्या ठेवींचा खुलासा, ₹1,777 कोटींचा ठावठिकाणा अद्याप अस्पष्ट*अॅनिमियामुक्त बेळगावच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल; चार दिवसांत 1,475 विद्यार्थ्यांची तपासणी**बेळगावच्या जलतरणपटूंचा जलवा! ‘वीर सावरकर चषक’वर स्विमर्स क्लबचा कब्जा**जेवढे ग्रेटफूल व्हाल तेवढे ग्रेट व्हाल- श्री प्रल्हाद वामनराव पै*