हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केल्याबद्दल कर्नाटक रक्षण वेदिकेने निषेध करून धैर्यशील माने यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. कन्नड साहित्य भवन येथून मोर्चा काढून राणी कित्तूर चन्नमा चौकात ठिय्या आंदोलन देखील केले. धैर्यशील माने यांचा निषेध असो अशा घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या. आंदोलनाच्या वेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. एक नोव्हेंबर रोजी बेळगातील काळ्या दिनाच्या कार्यक्रमाला येण्यास बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी धैर्यशील माने यांना प्रवेश बंदी केली होती.
यासंबंधी माने यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेऊन बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करून बेळगावात जाण्यास प्रवेश बंदी केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. याचा निषेध म्हणून कर्नाटक रक्षण वेदिकेने माने यांचा निषेध करत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.