LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*शेतकऱ्यांच्या उस दर आंदोलनाला विजयेंद्र यांचा पाठिंबा*

बेळगाव, ४ नोव्हेंबर :
राज्य भाजप अध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी आज बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील गुरळापूर येथे उस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भेट देत सरकारकडे योग्य ऊस दराची मागणी केली.

विजयेंद्र म्हणाले, “मी येथे केवळ माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचा मुलगा म्हणून नव्हे, तर शेतकऱ्यांच्या लढ्याला साथ देण्यासाठी आलो आहे. उस दराचा प्रश्न हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असून तो केवळ चर्चा आणि समन्वयातूनच सुटू शकतो.”

गेल्या काही दिवसांपासून गुरळापूर येथे शेतकरी राज्य सल्लागार दर (SAP) जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या मागण्यांबाबत सरकारने संवेदनशीलतेने विचार करून तोडगा काढावा, असे आवाहन विजयेंद्र यांनी केले.

ते पुढे म्हणाले, “सरकार निष्क्रिय राहते तेव्हा विरोधी पक्ष म्हणून आम्ही शेतकऱ्यांसोबत उभे राहणे ही आमची जबाबदारी असते. त्यामुळे मी आज सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.”

https://youtube.com/shorts/0i5aLJABKLg?si=NF3sauU7UFoL0wBQ

विजयेंद्र यांनी २०१४ मधील घटनेचा उल्लेख करताना सांगितले की, “त्यावेळी ऊस दराच्या प्रश्नावर शेतकरी विठ्ठल अरभावी यांनी आपले प्राण दिले होते. त्या वेळी माझे वडील येडियुरप्पा यांनी त्या घटनेनंतर मुख्यमंत्री यांच्यावर दबाव आणून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता.”

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*