Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*वेदांत मिसाळेची राष्ट्रीय जलतरणात सोन्याची कमाल*

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प येथे शिकणाऱ्या वेदांत आनंद मिसाळेने राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत ऐतिहासिक नोंद केली आहे. ६९व्या SGFI नॅशनल्स जलतरण स्पर्धेत त्याने ‘4×100 मीटर मेडले रिले’ प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करत शाळा आणि राज्याचा मान उंचावला आहे.

सीबीएसई शाळांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघाने ४:२०:६० मिनिटांची वेळ नोंदवून मागील ४:२५:४५ मिनिटांचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. या उल्लेखनीय विजयात वेदांतने १०० मीटर ‘बटरफ्लाय स्ट्रोक’ उत्कृष्ट वेगाने पूर्ण करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

या यशानंतर ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये आनंदाचे वातावरण असून विद्यार्थ्याच्या चिकाटी, शिस्त आणि खेळावरील निष्ठेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

शाळेच्या एस्.एम्.सी. कमिटीचे चेअरमन आणि ज्योती कॉलेजचे माजी प्राचार्य आर. के. पाटील, व्हाइस चेअरमन प्रो. आर. एस. पाटील, सचिव प्रो. नितीन घोरपडे, शालेय अॅडव्हायझरी डायरेक्टर श्रीमती मायादेवी अगसगेकर आणि मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांनी वेदांतचे अभिनंदन करत त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

वेदांतचा हा राष्ट्रीय दर्जाचा विक्रम बेळगावातील जलतरणक्षेत्रासाठी प्रेरणादायी मानला जात आहे.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*