Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*संगीत भजन स्पर्धेत वाल्मिकी भजनी मंडळ कुद्रेमानीला चतुर्थ क्रमांक*

 

हत्तरगी : प्रतिनिधी

गोकुळ अष्टमीनिमित्त श्री हरी मंदिर, हत्तरगी (ता. हुक्केरी) येथे आयोजित करण्यात आलेल्या संगीत भजन स्पर्धेत वाल्मिकी भजनी मंडळ, कुद्रेमानी यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत वाल्मिकी भजनी मंडळाने आपल्या सुमधुर गायनातून आणि सुरेल भजन सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. मंडळाला मिळालेले पारितोषिक सुप्रसिद्ध गायिका सौ. मंजुश्री कुलकर्णी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी मंडळाच्या सदस्यांनी पारितोषिक स्वीकारले.

या यशामागे मंडळाचे गुरुजी ह.भ.प. नंदू केसरकर महाराज यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मंडळातील सदस्यांनी सातत्याने भजनाची साधना करत संगीत व भक्तीचा सुंदर संगम साधला आहे.

या भजनी मंडळामध्ये जोतिबा बडसकर, महादेव हेमाणा तरवाळ, सुभाणा वैजू तरवाळ आणि नामदेव मल्लाप्पा कांबळे यांचा सहभाग आहे. तसेच श्रीमंता रा. नाईक, सौ. शांता ता. तरवाळ आणि सौ. ललिता प. तरवाळ यांनी सहभाग घेतला.

मंडळाच्या उपक्रमाला राजेंद्र पाटील, मारुती भ. तरवाळ, परशराम तरवाळ, यलापा तरवाळ, मैलापा तरवाळ आणि तानाजी तरवाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

वाल्मिकी भजनी मंडळाने अनेक बक्षिसे मिळविली आहेत. या यशाबद्दल कुद्रेमानी परिसरातून त्यांचे अभिनंदन होत असून, भक्ती, संगीत आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या मंडळाच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*भारत विकास परिषदेच्यावतीने आंतरशालेय "भारत को जानो" प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात  लिखित परिक्षेत शहरातील 7,800 विद्यार्थ्यांचा सहभाग**जिल्हास्तरीय जूडो स्पर्धेत रुतिक सनदीची सुवर्णझेप; 45 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक**संगीत भजन स्पर्धेत वाल्मिकी भजनी मंडळ कुद्रेमानीला चतुर्थ क्रमांक**जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या वतीने ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्कार जाहीर**श्री गणेश फेस्टिव्हल,रांगोळी स्पर्धेतून समाज प्रबोधनाचा संदेश,कविता गांगुर आणि अर्पिता रायकर विजेत्या**ज्युडोमध्ये मराठा मंडळ इंग्लिश मीडियम स्कूलची दमदार कामगिरी; दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड**पत्रकारांच्या सुरक्षेसाठी DNA आक्रमक; दिल्ली-पुण्यातील कथित घटनांची चौकशी करण्याची मागणी**खड्डेमुक्त बेळगाव उत्तरसाठी आमदार राजू सेठ मैदानात; तक्रारी मिळताच रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास सुरुवात नागरिकांच्या फोटो, लोकेशन आणि तक्रारींची तातडीने दखल; नोव्हेंबरपासून कायमस्वरूपी डांबरीकरणावर भर**श्रावणातील शेवटच्या सोमवारी सिद्धेश्वर मंदिरात लक्ष्मी हेब्बाळकरांची विशेष पूजा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ₹५० लाख विशेष अनुदानाचे आश्वासन; कंग्राळी बी.के. येथे धार्मिक कार्यक्रम उत्साहात**विद्यार्थ्यांच्या अनोख्या सरप्राईजने शिक्षक भारावले; स्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीत शिक्षक दिन उत्साहात भूमिकानाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध खेळांतून विद्यार्थ्यांनी व्यक्त केला शिक्षकांप्रती सन्मान*