विद्यार्थ्यांना केवळ शिकविले जाणार नाही तर स्वतः करून शिकण्याचा( learning by doing) हा अनुभव मिळणार आहे .यात सेन्सरची , बेसिक कोडी ,थ्रीडी प्रिंटिंग आणि डिझाइनिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI )वर आधारित प्रकल्प या आधुनिक तंत्रज्ञान विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. यातून विद्यार्थ्यांना नवीन कल्पनांना आकार देणे, वैज्ञानिक विचार विकसित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
विज्ञानात रुची असलेल्या व संशोधन प्रयोग व वैज्ञानिक विचार विकसित करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला चालना मिळून त्यांच्यातील समस्या सोडविण्याची क्षमता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होईल.
इच्छुक विद्यार्थ्यांनी अटल tinkering lab येथे संपर्क साधून या कॅम्पमध्ये सहभागी व्हावे.
Also read









