Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*‘इथे ओशाळला मृत्यू’चे 15 मार्च रोजी लोकमान्य रंगमंदिरात दोन प्रयोग*

बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यपूर्ण जीवनावर आधारित प्रसिद्ध ऐतिहासिक नाटक “इथे ओशाळला मृत्यू” येत्या 15 मार्च 2026 रोजी बेळगावातील लोकमान्य रंगमंदिरात रंगणार आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने या नाट्यप्रयोगांचे आयोजन करण्यात आले असून शहरातील रसिकांसाठी दोन प्रयोग सादर केले जाणार आहेत.

पहिला प्रयोग दुपारी 3 वाजता, तर दुसरा प्रयोग सायंकाळी 7 वाजता होणार आहे. प्रख्यात साहित्यिक प्रा. वसंत कानेटकर लिखित या नाटकाची निर्मिती शिवगणेश प्रोडक्शन, सिंधुदुर्ग (मुंबई) यांनी केली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा या नाटकातून प्रभावीपणे उलगडण्यात येते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मोगल सम्राट औरंगजेबाने दक्षिणेत आक्रमण केले. त्या काळात छत्रपती संभाजी महाराजांनी 1681 ते 1689 या नऊ वर्षांच्या कालखंडात औरंगजेबाविरुद्ध दिलेली पराक्रमी झुंज आणि स्वराज्यासाठी दिलेले बलिदान या नाटकात नाट्यमय पद्धतीने सादर केले जाते.

या नाटकात प्रमुख भूमिकांमध्ये डॉ. सोनल लेले, प्रा. मिलिंद कासार, कृष्णा देसाई, संदेश देसाई, मंदार जंगम, विजय बर्डे, कुलदीप परब आणि मुख्य भूमिकेत गणेश ठाकूर यांचा समावेश आहे.

शिवगणेश प्रोडक्शन ही ऐतिहासिक नाट्यप्रयोग सादर करणारी नामांकित संस्था असून त्यांनी यापूर्वी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘ती फुलराणी’, ‘नरसिंह शिवराय’ यांसारखी दर्जेदार नाटके रंगभूमीवर सादर केली आहेत. आतापर्यंत ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकाचे सुमारे 90 प्रयोग यशस्वीपणे सादर झाले आहेत.

या नाट्यप्रयोगातून मिळणारा निधी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांसाठी वापरला जाणार आहे. कार्यक्रमासाठी प्रसाद मेडिकल मॉल, शनिवार खुट बेळगाव तसेच आर. एम. चौगुले अँड असोसिएट हे मुख्य प्रायोजक आहेत.

देणगी प्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्ध आहेत –

युवा समिती कार्यालय, टिळकवाडी

शिवाजी कुडूयकर ज्वेलर्स, खडेबाजार (शहापूर)

डी.बी. पाटील फोटो स्टुडिओ, बेळगाव

मसनाबाई स्कूटर, शिवाजीनगर

गजानन छप्रे, मच्छे

प्रसाद मेडिकल मॉल, शनिवार खुट

या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, श्रीकांत कदम, प्रसाद मेडिकल मॉलचे सी. के. पाटील, सुरज कुडुचकर, वासू शामजी आदी उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*