Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News | Sports News

ट्रॉफी, मेडल, सर्टिफिकेट अन् गिफ्ट हॅम्पर; ‘फ्लेक्स क्लासिक 2026’च्या पुरस्कारांचे उद्घाटन

ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र अन् गिफ्ट हॅम्परचे उद्घाटन; 23 सप्टेंबरला मराठा मंदिर रेल्वे ओव्हरब्रिज येथे होणार स्पर्धा

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ, बेळगाव यांच्या माध्यमातून आणि बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्सच्या सहकार्याने ‘जय गणेश श्री 2026’ या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 23 सप्टेंबर 2026 रोजी ही स्पर्धा होणार असून, यानिमित्ताने बेळगावातील शरीरसौष्ठवपटूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या स्पर्धेच्या निमित्ताने फ्लेक्स जिमचे मालक चेतन तशिलदार यांच्या सहकार्याने ‘फ्लेक्स क्लासिक 2026’ ही शरीरसौष्ठव स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. मराठा मंदिर रेल्वे ओव्हरब्रिज परिसरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्रे आणि गिफ्ट हॅम्परचे उद्घाटन आज फोर्ट रोड येथील फ्लेक्स जिममध्ये उत्साहात पार पडले. यावेळी स्पर्धेची तयारी, सहभागी होणारे शरीरसौष्ठवपटू आणि स्पर्धेचे नियोजन याबाबत उपस्थित मान्यवरांनी माहिती घेतली.

उद्घाटन कार्यक्रमाला OYO Shawa हॉटेलचे मालक परमिंदर सिंग खुराना, विमल फाउंडेशनचे चेअरमन किरण जाधव, मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघडगी, सॉफ्टवेअर कंपनीत सायबर सिक्युरिटी क्षेत्रात कार्यरत हर्षा लोखंडे, BDBBA&S चे सचिव तथा माजी शरीरसौष्ठवपटू राजेश लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अनिल अमरोळे, सुनील बोकडे, नारायण चौगुले, सुनील चौधरी, बाबू पावशे, चेतन तशिलदार, भरत बाळेकुंद्री, नूर सनदी, विजय चौगुले आणि राजू पाटील यांच्यासह शरीरसौष्ठव क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शरीरसौष्ठवपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने क्रीडा क्षेत्राला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘फ्लेक्स जिम क्लासिक 2026’च्या TOP 10 विजेत्यांना विशेष गौरव करण्यात येणार असल्याने स्पर्धेकडे शरीरसौष्ठव क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

स्पर्धेच्या माध्यमातून बेळगावातील तसेच परिसरातील शरीरसौष्ठवपटूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार असून, ‘जय गणेश श्री 2026’ आणि ‘फ्लेक्स क्लासिक 2026’ या दोन्ही स्पर्धांमुळे गणेशोत्सवाला क्रीडा क्षेत्राची रंगत लाभणार आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*खड्डेमुक्त बेळगाव उत्तरसाठी आमदार राजू सेठ मैदानात; तक्रारी मिळताच रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास सुरुवात नागरिकांच्या फोटो, लोकेशन आणि तक्रारींची तातडीने दखल; नोव्हेंबरपासून कायमस्वरूपी डांबरीकरणावर भर**श्रावणातील शेवटच्या सोमवारी सिद्धेश्वर मंदिरात लक्ष्मी हेब्बाळकरांची विशेष पूजा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ₹५० लाख विशेष अनुदानाचे आश्वासन; कंग्राळी बी.के. येथे धार्मिक कार्यक्रम उत्साहात**विद्यार्थ्यांच्या अनोख्या सरप्राईजने शिक्षक भारावले; स्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीत शिक्षक दिन उत्साहात भूमिकानाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध खेळांतून विद्यार्थ्यांनी व्यक्त केला शिक्षकांप्रती सन्मान**१३ वर्षांनंतर मारहाण प्रकरणाचा निकाल**कुद्रेमानीचा राजा* *गणेशोत्सवाच्या मुहूर्तमेढीचा शुभारंभ* *माजी सैनिक मेजर सुबराव निंगाप्पा पाटील यांच्या हस्ते मुहूर्तमेढ उभारणी*कल्लेहोळ मराठी शाळेत गुरुवंदना सोहळा; सुळगे (U) शाळेने पटकावले सर्वसाधारण अजिंक्यपद*शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नव्हे, तर राष्ट्रशिल्पकार*!     – सीमाकवी रवींद्र पाटीलस्कायवर्ल्ड एव्हिएशन अकादमीच्या विद्यार्थ्यांची भरारी; बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा विभागात निवडट्रॉफी, मेडल, सर्टिफिकेट अन् गिफ्ट हॅम्पर; ‘फ्लेक्स क्लासिक 2026’च्या पुरस्कारांचे उद्घाटनबेळगाव श्री गणेश फेस्टिवलला उत्साहात सुरुवात