LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*यात्री सेवा दिवस" उत्साहात; बेळगांव विमानतळावर प्रवासी व समाजाभिमुख उपक्रमांचा मेळावा*

बेळगांव, १७ सप्टेंबर २०२५ : भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने "यात्री सेवा दिवस" बेलगावि विमानतळावर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रवाशांचा प्रवास अनुभव अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि आनंददायी करण्याबरोबरच समाजाशी जुळलेली जबाबदारी अधोरेखित करण्याचा हा दिवस ठरला.

या विशेष दिवशी बेलगावि विमानतळावर शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, विमान वाहतुकीवरील माहिती सत्रे, तसेच फोटो बूथची व्यवस्था करण्यात आली. विद्यार्थ्यांना विमान उड्डाण शाळा, विमान कंपन्या आणि एएआयच्या तज्ज्ञांसोबत संवाद साधण्याची संधी देण्यात आली

माननीय खासदार श्री. जगदीश शेट्टर आणि जिल्हाधिकारी श्री. मोहम्मद रोशन यांच्या हस्ते प्रवाशांसाठी मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्यात आली. याशिवाय प्रवाशांचे गुलाबकळी, टिळक व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे पारंपरिक स्वागत करण्यात आले. प्रश्नमंजुषा कार्यक्रम, मोफत आरोग्य तपासणी, तसेच महेश फाउंडेशनच्या सहकार्याने रक्तदान शिबिर ही उपक्रम देखील घेण्यात आले.

पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. यामुळे प्रवासी सेवा, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणीय भान यांचा संगम साधला गेला.

उत्तर कर्नाटकातील सर्वात जुन्या विमानतळांपैकी एक असलेला बेलगावि विमानतळ सध्या दिल्ली, मुंबई, बेंगळुरु, हैदराबाद, अहमदाबाद आणि जयपूरशी हवाईदृष्ट्या जोडलेला आहे. या भागाच्या आर्थिक विकासाला चालना देणारे हे केंद्र प्रवाशांच्या सुरक्षिततेसह उच्च प्रतीच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यानिमित्ताने करण्यात आला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*