LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*कणबर्गी परिसरात तलवार घेऊन फिरणारे तिघे जेरबंद*

कणबर्गी परिसरात तलवार घेऊन फिरणारे तिघे जेरबंद

बेळगाव :
शहरात अलीकडे घडत असलेल्या वारंवार स्टॅबिंग प्रकारांमुळे बेळगावकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन माळमारुती पोलिसांनी गस्त वाढवून संशयितांवर नजर ठेवली आणि शनिवारी मोठी कारवाई केली.

20 सप्टेंबर 2025 रोजी रात्री कणबर्गी येथील क्रिकेट स्टेडियमजवळ गस्तीवर असलेल्या पथकाने संशयित मोटारसायकल अडवली. तपासणी दरम्यान बाइकवरून धारदार तलवार सापडली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघा जणांना जेरबंद केले.

अटक केलेले आरोपी असे :

अरुण राम बाहेरकरी (32, ज्योतिर्लिंग गल्ली, कणबर्गी)

विक्रांत करप्पा नायक (28, मदकर गल्ली, कणबर्गी)

राहुल ज्योतिबा उचगावकर (31, सिद्धेश्वर नगर, कणबर्गी)

त्यांच्याकडून ₹15,000 किंमतीची हिरो होंडा मोटारसायकल आणि तलवार जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा प्र.क्र.180/2025 दाखल करण्यात आला असून, भारतीय शस्त्र कायदा कलम 27(1) व केपी अॅक्ट कलम 97 अंतर्गत पुढील चौकशी सुरू आहे.

दरम्यान, या धाडसी कारवाईबद्दल शहराचे पोलिस आयुक्त आणि उपआयुक्त यांनी पथकाचे कौतुक केले असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरूच राहतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*