Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*घराचा पाया खोदताना खजिना सापडला*

घर बांधण्यासाठी पाया खोदताना एका कलशात सोन्याची नाणी, दागिने आणि मूर्ती असलेला खजिना सापडला. गदग तालुक्यातील लकुंडी गावात हा खजिना मिळाला आहे.
लकुंडी गावातील गंगव्वा बसवराज रित्ती यांनी आठवड्यापूर्वी जुने घर पाडवले. नवीन घर बांधण्यासाठी पाया खोदत असताना त्यांना हा खजिना सापडला. एका कलशात सोन्याची नाणी, दागिने आणि मूर्ती असल्याचे आढळून आले. लगेच या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. खजिना सापडलेल्या स्थळाला गदग जिल्हा पोलीस प्रमुख,तहसीलदार आणि पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली.खजिना सापडल्याचे कळताच गावातील लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. यापूर्वी देखील या गावात पंधरा हून अधिक प्राचीन अवशेष पुरातत्व खात्याला सापडले आहेत.

अनेक प्राचीन मंदिरे आणि वास्तू या गावात आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत याचा समावेश करण्यासाठी पर्यटन विभागाने प्रस्ताव यापूर्वी पाठवला आहे. पुरातत्व खात्याने सापडलेला खजिना आपल्या ताब्यात घेतला असून त्याचे संशोधन केले जाणार आहे.खजिना मिळालेली माहिती प्रशासनाला दिल्याबद्दल गंगव्वा रित्ती आणि त्यांच्या मुलाचा सत्कार करण्यात आला.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*