Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*महापौर, उपमहापौर व नगरसेवक करणार चित्ररथ मार्गाची पाहणी*

मंगळवार, दिनांक 21 रोजी होणाऱ्या भव्य-दिव्य शिवजयंती चित्ररथ सोहळा यंदा उत्साहात व सुरळीत पार पडावा, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या वतीने सोमवारी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या कक्षात महापौर प्रीती कामकर व उपमहापौर हणमंत कोंगाली यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, साहित्यिक गुणवंत पाटील, प्रसाद मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. तसेच गटनेते संतोष पेडणेकर, माजी गटनेते गिरीश धोंगडी, नगरसेवक जयतीर्थ सौंदती, श्रीयेश नाकाडी आणि रमेश सोनटकी उपस्थित होते.

या बैठकीत चित्ररथ सोहळा अधिक सुव्यवस्थित आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडण्यासाठी विविध मागण्या करण्यात आल्या. त्यास महापौर, उपमहापौर व नगरसेवकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

प्रेक्षकांना चित्ररथ व्यवस्थित पाहता यावा यासाठी गॅलरी उभारणी, ठिकठिकाणी स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या मिरवणुकीदरम्यान शिवभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून उपहारगृहे सुरू ठेवावीत, अशीही सूचना करण्यात आली.

तसेच पोलीस प्रशासन, हेस्कॉम, महानगरपालिका, वैद्यकीय सेवा आणि इतर तातडीच्या मदत यंत्रणांचा समन्वय साधण्यासाठी एकत्रित मदत कक्ष स्थापन करावा, तसेच पत्रकारांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, यावरही चर्चा झाली.

महापौर, उपमहापौर व नगरसेवकांनी या सर्व सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देत स्वतःच्या सूचना मांडल्या. लवकरच चित्ररथ मिरवणूक मार्गाची पाहणी करून आवश्यक त्या सुविधा व उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*