Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*'हरे कृष्ण रथयात्रा' महामहोत्सवाचा शनिवारी प्रारंभ*

'हरे कृष्ण रथयात्रा' महामहोत्सवाचा शनिवारी प्रारंभ ; २४ व २५ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

बेळगाव: आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन),च्या वतीने सलग २८ व्या वर्षी भव्य 'हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कमिटी जोमाने कामास लागली आहे.

शनिवारी दुपारी एक वाजता धर्मवीर संभाजी चौक येथे उभारण्यात आलेल्या शामियाण्यात इस्कॉन चे अध्यक्ष प.पू.
भक्तीरसामृत स्वामी महाराज आणि इतर ज्येष्ठ संन्याशांची भाषणे होतील त्यानंतर रथयात्रेस प्रारंभ होईल. अग्रभागी जोडलेले दोरखंड ओढत ही रथयात्रा कॉलेज रोड, समादेवी गल्ली, खडी बाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली मार्गे ओवर ब्रिजवरून शहापुरात पोहचेल. तेथून नाथ पै सर्कल कडून गोवा वेस व साडेसहा वाजता इस्कॉन मंदिराच्या पाठीमागे उभारलेल्या मंडपात पोहोचेल.

रथयात्रा मार्गावर ठिकठिकाणी पाणी, सरबत, फळे यांचे वाटप केले जाईल तसेच अनेक ठिकाणी रथावर पुष्पवृष्टी केली जाईल. रथाच्या मार्गावर अग्रभागी रांगोळ्या घालणारे एक पथक असेल. रथयात्रेत अनेक सजवलेल्या बैलजोड्या त्याचबरोबर अनेक चित्ररथ सहभागी होतील. देश विदेशातून आलेले अनेक भक्त या रथयात्रेत सहभागी होतील.

या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे भगवान श्री श्री राधा-कृष्ण आणि निताई गौर सुंदर भगवान यांचे भव्य रथ असेल. सुंदर वस्त्रांनी आणि पुष्पहारांनी सजवलेल्या रथात विराजमान होऊन भगवान बेळगाववासीयांना दर्शन देऊन आशीर्वाद देणार आहेत.
विविध कीर्तन पथके 'हरे कृष्ण' महामंत्राचा जयघोष करत आणि नृत्याविष्कार सादर करत या उत्सवात सहभागी होतील.
"ज्येष्ठ संन्याशांची उपस्थिती"
या महोत्सवासाठी इस्कॉनचे ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, मॉरिशस येथील परमपूज्य सुंदर चैतन्य स्वामी महाराज, मुंबईचे श्री दयाल चंद प्रभू आणि परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्यासह अनेक वरिष्ठ भक्त उपस्थित राहणार आहेत
प्रसाद वितरण: संपूर्ण मार्गावर सुमारे ५०,००० हून अधिक प्रसादाच्या पाकिटांचे वाटप केले जाईल.

ग्रंथ वितरण: इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी भगवद्गीताच्या आधारावर रचलेली व इतर आध्यात्मिक साहित्याचे वितरण यावेळी केले जाईल.
इस्कॉन मंदिराच्या मागील परिसरात आकर्षक पद्धतीने सजवलेले पंडाल व विविध स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. शनिवार व रविवार असे दोन दिवस मंडपामध्ये भजन, कीर्तन, आरती, बालकार्यक्रम तसेच इस्कॉनमधील ज्येष्ठ भक्तांची प्रवचने होतील.
याशिवाय भगवद्गीता प्रदर्शन, स्लाइड शो, मेडिटेशन पार्क (ध्यान केंद्र), देखावे, आध्यात्मिक पुस्तकांचे व भक्तीपर वस्तूंचे स्टॉल्स तसेच श्रीकृष्ण प्रसादाचे मोफत वितरण इत्यादी अनेक उपक्रमांची व्यवस्था करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, येथे 'गो-सेवा' दालन असून त्यात गोमूत्र आणि शेणापासून बनवलेली उत्पादने उपलब्ध असतील दोन्ही दिवस रात्रि भेट देण्यास येणाऱ्या प्रत्येकास'महाप्रसाद' दिला जाणार असून आहे.
नागरिकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉन तर्फे करण्यात आले आहे.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*