LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*मराठी विद्यानिकेतनचे खो-खो स्पर्धेत यश*

*मराठी विद्यानिकेतनचे खो-खो स्पर्धेत यश*
गर्लगुंजी येथे एकलव्य क्रीडा संघातर्फे 14 वर्षाखालील व 14 वर्षावरील मुलामुलींच्या खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मराठी विद्यानिकेतन माध्यमिक विभागाच्या मुलींच्या खो-खो संघाने प्रथम क्रमांक पटकावत रोख रक्कम 11,111 रुपये बक्षीस व ट्रॉफी जिंकली . या स्पर्धेत स्नेहा हिरोजीची ऑल-राउंडर खेळाडू व वैष्णवी कोवाडकरची उत्कृष्ट धावपटू म्हणून निवड करण्यात आली.

14 वर्षावरील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात भावेश्वरी क्रीडा क्लब येडोगा 'अ' संघावर एकतर्फी विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच 14 वर्षाखालील मुलांनी तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात सुरपूर क्रीडा संघाचा एक डाव व एक गुणांनी विजय मिळवत रोख रक्कम 2222 रू व ट्रॉफी असे तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकाविले.या संघांना प्रशिक्षक श्रीधर बेन्नाळकर यांचे मार्गदर्शन लाभले.

या खो -खो संघांना शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील , शिक्षण संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार ,क्रीडा शिक्षक दत्ता पाटील, महेश हगिदळे, वैभवी दळवी , शिक्षकवर्ग यांचे प्रोत्साहन मिळाले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!**आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वातिक पाटील यांचा बेळगावात भव्य सत्कार!**बद्रीनाथहून परतताना हेलिकॉप्टर कोसळले; बेळगावचे CCB निरीक्षक अरुण साळुंके यांच्यासह सहा जणांचा मृत्यू**१ नोव्हेंबर काळ्या दिनाची युवा समिती सीमाभाग तर्फे जनजागृती**पुणे विभाग समितीचे पुणे जिल्हाधिकाऱ्यासमोर,१ नोव्हेंबरला ‌धरणे सत्याग्रह* *पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या जलतरणपटूंचा दबदबा; ५७ सुवर्णपदकांसह ६९ पदकांची कमाई!**मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेसाठी स्वतंत्र दालन उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही**बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये १०८ वा शरकत दिन उत्साहात; सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण*