LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*अनगोळ येथे श्री विश्वकर्मा 2026 क्रिकेट ट्रॉफी उत्साहात संपन्न; एम.एम. कॉलेज विजेते*

बेळगाव | प्रतिनिधी

अनगोळ येथे आयोजित करण्यात आलेली श्री विश्वकर्मा 2026 क्रिकेट ट्रॉफी मोठ्या उत्साहात व खेळाडूवृत्तीच्या वातावरणात पार पडली. या स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग नोंदवत क्रिकेटप्रेमींना थरारक सामने पाहण्याची संधी दिली.

या स्पर्धेचे आयोजन श्री विश्वकर्मा मनू मय संस्था, एस.पी.एम. रोड, बेळगाव यांच्या वतीने करण्यात आले होते. अंतिम फेरीसह बक्षीस वितरण समारंभ संस्थेचे उपाध्यक्ष श्री प्रभाकर सुतार आणि दिग्दर्शक श्री यशवंत सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

चुरशीच्या अंतिम सामन्यात एम.एम. कॉलेज संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला, तर संगोळी रायांना वॉरियर्स संघाने द्वितीय क्रमांक मिळवून कौतुकास्पद कामगिरी केली.

स्पर्धेच्या माध्यमातून युवकांमध्ये क्रीडाभावना, संघभावना व शिस्तीचा संदेश देण्यात आला. आयोजकांच्या यशस्वी नियोजनामुळे स्पर्धा सुरळीतपणे पार पडली. विजेत्या व उपविजेत्या संघांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!**आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वातिक पाटील यांचा बेळगावात भव्य सत्कार!**बद्रीनाथहून परतताना हेलिकॉप्टर कोसळले; बेळगावचे CCB निरीक्षक अरुण साळुंके यांच्यासह सहा जणांचा मृत्यू**१ नोव्हेंबर काळ्या दिनाची युवा समिती सीमाभाग तर्फे जनजागृती**पुणे विभाग समितीचे पुणे जिल्हाधिकाऱ्यासमोर,१ नोव्हेंबरला ‌धरणे सत्याग्रह* *पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या जलतरणपटूंचा दबदबा; ५७ सुवर्णपदकांसह ६९ पदकांची कमाई!**मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेसाठी स्वतंत्र दालन उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही**बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये १०८ वा शरकत दिन उत्साहात; सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण*