Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न*

बेळगाव : श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडची ७५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी बँकेच्या श्रीमान अर्जुनराव मेघोजीराव दळवी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बँकेचे चेअरमन प्रकाश आ. मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासोबतच सभासदांनी विविध महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.

बँकेचे मॅनेजर संकोच कुंदगोळकर यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले. यावेळी मागील अहवाल वर्षात निधन झालेल्या बँकेच्या सभासद व हितचिंतकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळले.

यानंतर बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रदीप ओऊळकर यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. तसेच असिस्टंट मॅनेजर प्रवीण पाटील यांनी १७ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त सादर केले. सभासदांनी त्यास एकमताने मंजुरी दिली.

शाखा प्रबंधक सागर हावळाणाचे यांनी बँकेचा ताळेबंद व नफा-तोटा पत्रक सभेसमोर मांडले. लोन सुपरिटेंडंट रणजित शिंदे यांनी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. बँकेचे अकाउंटंट संदीप मोरे यांनी लेखापरीक्षण अहवालाचे वाचन केले. या सर्व विषयांवर सभासदांनी चर्चा करून सूचना मांडल्या आणि संबंधित प्रस्तावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

शैक्षणिक कर्जाचा व्याजदर कमी करण्याची मागणी
सभेत ज्येष्ठ सभासद शिवाजी तारीहाळकर, रघुनाथ बांडगी आणि देवकुमार विजे यांनी बँकेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अधिक सुलभपणे कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी शैक्षणिक कर्ज अल्प व्याजदरात देण्याची मागणी करण्यात आली.

तसेच हृदय शस्त्रक्रियेसारख्या गंभीर वैद्यकीय उपचारांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही सभासदांनी मांडली. या सूचनांची बँक व्यवस्थापनाने नोंद घेतली.

अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. बँकेवर सभासदांनी दाखविलेला विश्वास आणि सातत्याने दिलेले सहकार्य याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
सभेच्या शेवटी संचालक राजेंद्र पवार यांनी आभार मानले. बँकेचे मॅनेजर संकोच कुंदगोळकर यांनी सूत्रसंचालन केले.

सभेला संचालक नारायण पाटील, संजय बाळेकुंद्री, प्रवीण जाधव, विजय पाटील, महादेव सोंगाडी, सुनील आनंदाचे, संदीप मुतकेकर, राजू मरवे, वंदना अ. धामणेकर, पल्लवी सरनोबत, विनोद आंबेवाडीकर यांच्यासह अनेक सभासद व मान्यवर उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*वडगावात शेतकऱ्यांची महत्त्वाची बैठक; बेळ्ळारी नाल्याच्या पूरस्थितीवर ठोस निर्णयाची तयारी**बेळगावात पावसात वृद्ध आंदोलकांसाठी पोलीस आयुक्तांचा माणुसकीचा हात**श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न**दिल्लीमध्ये आमदार अभय पाटील यांच्या कारला भीषण अपघात; इनोव्हा-स्विफ्टची धडक, सर्वजण सुखरूप**राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत बेळगांव चा सर्वेश पाटील ची चमकदार कामगिरी**श्री राजमाता महिला बहुउद्देशीय सोसायटीची 33 वी  वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत*विद्याभारती  राज्यस्तरीय मलखांब स्पर्धेला प्रारंभ.बेळगाव मार्केट पोलिसांची मोठी कामगिरी; CEIRच्या मदतीने 123 हरवलेले मोबाईल शोधलेअपघातग्रस्त युवकाच्या कुटुंबाला लक्ष्मी हेब्बाळकरांचा मदतीचा हात; रेल्वे अपघातातील रोहितच्या कुटुंबीयांना दिलासाराष्ट्रीय सब-ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावची दिशा होंडी चमकली; सुवर्णासह दोन रौप्यपदकांची कमाई