Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*श्री स्वामी समर्थ मंदिरात ५१ वस्त्रांची अनोखी आरास*

श्री स्वामी समर्थ मंदिरात ५१ वस्त्रांची अनोखी आरास

बेळगाव : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बापट गल्ली कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवनी पादुका मंदिरात विविधरंगी आरासे साकारल्या जात आहेत. दररोज भक्तांना आकर्षित करणाऱ्या या सजावटींमध्ये श्रद्धा, कलात्मकता आणि भक्तीभावाचा सुरेख संगम पाहायला मिळतो.

शुक्रवारी मंदिरात विशेष आकर्षण ठरली ती ५१ वस्त्रांची अनोखी आरास. ब्लाऊज पीस वापरून सुंदर पद्धतीने करण्यात आलेली ही सजावट पाहण्यासाठी भक्तांची गर्दी उसळली होती. भाविकांनी ही आगळीवेगळी आरास बघून समाधान व्यक्त केले.

नवरात्र उत्सवाच्या काळात स्वामी समर्थांच्या चरणी भक्ति अर्पण करण्यासाठी मंदिरात रोज वेगवेगळ्या प्रकारची सजावट केली जाते. प्रत्येक दिवशी साकारल्या जाणाऱ्या या आरासांमुळे श्रद्धाळूंच्या मनात नवीनतेची उत्सुकता निर्माण होत असून, मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघत आहे.

मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी स्वच्छता, शिस्तबद्ध दर्शन व्यवस्था आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांमुळे कार पार्किंग परिसर भक्तीमय वातावरणाने उजळून निघाला आहे.

भक्तांच्या सहभागातून साकार झालेली ५१ वस्त्रांची आरास ही केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून, कलात्मकतेचा अनोखा आविष्कार ठरल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*