बेळगाव | डी मीडिया न्यूज
कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियंका जारकीहोळी आणि युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मानव बंधुत्व वेदिकेच्या वतीने सोमवारी, १७ ऑगस्ट रोजी श्री बसव पंचमी उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पूज्य स्वामीजींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भगवान बसवेश्वरांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाला मंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्वीय सहाय्यक तथा केपीसीसी सदस्य मलागौडा पाटील, बेळगाव काँग्रेस जिल्हा सचिव प्रदीप एम. जे., कर्नाटक रक्षण वेदिकेचे अध्यक्ष दीपक गुडगनट्टी, बर्मण्णा तोळी, लिंगायत समाजाचे अध्यक्ष गुडूस सर, विजय तळवार सर, विनय नावुलकट्टी यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, शाळेतील कर्मचारी, समितीचे अध्यक्ष व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बसव पंचमीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून समाजात मानवता, समानता आणि बंधुत्वाची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
