LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*नंदगडमध्ये महिला कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद*

नंदगडमध्ये महिला कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; पुरुष गटातील सामने पावसामुळे पुढे ढकलले

नंदगड (प्रतिनिधी):
नंदगड येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दीपावली निमित्ताने क्रीडामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या पारंपरिक क्रीडामहोत्सवाचा हा 66 वा वर्ष ठरला असून, उदघाटन खानापूर तालुक्याचे आमदार श्री. विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते 22 ऑक्टोबर रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. पी. के. पाटील होते.

यावर्षीच्या कै. एम. के. पाटील स्मृती चषक स्पर्धेत प्रथमच महिला कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. पावसाच्या अडथळ्यामुळे पहिल्या दिवशी सामने न होऊ शकल्याने, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी महिला गटातील सामने पार पडले. या स्पर्धांमध्ये आजरा संघाने विजेतेपद, तर नंदगडच्या झुंजवाडकर संघाने उपविजेतेपद पटकावले.

दरम्यान, पावसाच्या जोरदार सरींमुळे पुरुष गटातील कबड्डी सामने पुढे ढकलण्यात आले असून, त्याची पुढील तारीख आयोजकांकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

कार्यक्रमावेळी व्यासपीठावर सूर्याजी पाटील, के. पी. पाटील, धनंजय पाटील, मल्लाप्पा मारिहाळ, सदानंद पाटील, यल्लाप्पा गुरव, भरमाजी पाटील, लक्ष्मण पाटील, नारायण (पप्पू) पाटील, रणजित पाटील, भरमानी पाटील, सुनीता पाटील, वैष्णवी पाटील, अडली मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

पंच म्हणून के. व्ही. पाटील, के. आर. पाटील, पी. आर. पाटील, उमेश धबाले, अशोक पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजू पाटील, नागेंद्र पाटील, किरण पाटील, दिलीप पाटील, के. एम. पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

नंदगडमधील हा क्रीडामहोत्सव स्थानिक तरुणांना खेळाची प्रेरणा देणारा ठरला असून, महिला खेळाडूंच्या सहभागामुळे कार्यक्रमात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*